WTC Points Table : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे सर्व सामने संपले, आता भारत-ऑस्ट्रेलियामध्ये फायनल, पाहा संपूर्ण गुणतालिका सविस्तर
WTC Points Table 2023 : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका संपल्यामुळे, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा लीग टप्पा देखील संपला आहे.
ICC WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2021-23 च्या लीग आवृत्तीचे सामने आज (20 मार्च) न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासह संपले आहेत. यावेळी, ऑस्ट्रेलियन संघाने 19 पैकी 11 सामने जिंकले आहेत आणि 66.67 टक्के गुणांसह WTC पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. यानंतर भारतीय संघ 10 विजयांसह 58.80 टक्के गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्यामुळे आता WTC च्या या आवृत्तीचा अंतिम सामना आता 7 जून रोजी ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होणार आहे. या दुसऱ्या आवृत्तीतील इतर संघांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. आफ्रिकेने या आवृत्तीत 15 पैकी 8 सामने जिंकले, तर ते 55.56 टक्के गुणांसह पूर्ण झाले. त्याचबरोबर यापूर्वी अत्यंत खराब कामगिरी करणाऱ्या इंग्लंडने मात्र बेन स्टोक्स कर्णधार झाल्यानंतर शानदार पुनरागमन केले. इंग्लंडने 22 पैकी 10 सामने जिंकून 46.97 टक्के गुण मिळवले. यानंतर श्रीलंका संघ पाचव्या स्थानावर आहे ज्याने 12 पैकी 5 सामने जिंकले आणि 44.44 टक्के गुण मिळवले.
WTC च्या पहिल्या हंगामातील विजेता न्यूझीलंड सहाव्या स्थानावर आहे
WTC च्या पहिल्या हंगामाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करणाऱ्या न्यूझीलंडसाठी दुसरा हंगाम काही खास ठरला नाही. किवी संघ यावेळी खेळलेल्या 13 पैकी फक्त 4 सामने जिंकू शकला आणि 38.46 टक्के विजयी गुणांसह 6 व्या स्थानावर राहिला. यानंतर, जर आपण पॉइंट टेबलवरील शेवटच्या 3 स्थानांबद्दल बोललो तर पाकिस्तानचा संघ 38.10 टक्के गुणांसह 7व्या स्थानावर आहे, तर वेस्ट इंडिजचा संघ 34.62 टक्के गुणांसह 8व्या स्थानावर आहे. त्याचबरोबर बांगलादेशचा संघ 11.11 टक्के गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे.
आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022-23 गुणतालिका:
संघ | विजय | पराभव | अनिर्णीत | एकूण गुण | विजयी टक्केवारी |
1. ऑस्ट्रेलिया | 11 | 3 | 5 | 152 | 66.67 |
2. भारत | 10 | 5 | 3 | 127 | 58.08 |
3. दक्षिण आफ्रीका | 8 | 6 | 1 | 100 | 55.56 |
4. इंग्लंड | 10 | 8 | 4 | 124 | 46.97 |
5.श्रीलंका | 5 | 6 | 1 | 64 | 44.44 |
6. पाकिस्तान | 4 | 6 | 4 | 64 | 38.10 |
7. वेस्ट इंडीज | 4 | 7 | 2 | 54 | 34.62 |
8. न्यूझीलंड | 3 | 6 | 3 | 48 | 33.33 |
9. बांगलादेश | 1 | 1 | 10 | 16 | 11.11 |
अन् भारताची WTC फायनलमध्ये एन्ट्री
अहमदाबाद येथील घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS 4th Test) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना भारतीय संघ खेळला. या कसोटी सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला किंवा त्यात भारताचा पराभव झाला, असता तर श्रीलंकेला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी मिळाली असती. त्यानुसार सामना अनिर्णीत राहिला पण श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. सामन्यात श्रीलंकेने आधी 355 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 373 धावा केल्या. मग श्रीलंकेचा दुसरा डाव 302 धावांवर आटोपल्यावर यजमान न्यूझीलंडला सामन्याच्या चौथ्या डावात विजयासाठी 285 धावांचे लक्ष्य मिळाले. जे त्यांनी 8 गड्यांच्या बदल्यात पूर्ण करत सामना जिंकला. ज्यामुळे भारताची गुणतालिकेतील स्थिती मजबूत झाली असून भारत थेट WTC Final साठी पात्र ठरला.
हे देखील वाचा-