Nita Ambani : महिला क्रिकेटमध्ये क्रांती घडवेल WPL; मुंबई इंडियन्सच्या सर्वेसर्वा निता अंबानींचा विश्वास, लिलावानंतर काय म्हणाल्या?
Nita Ambani on WPL Auction 2023 : वुमेन्स प्रीमियर लीग (Women's Premier League) लिलावानंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण निता अंबानी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
Nita Ambani on WPL : पहिल्या वुमेन्स प्रीमियर लीगचा लिलाव (Women's Premier League) मंगळवारी पार पडला. या लिलावामध्ये भारतासह विदेशी खेळाडूंचीही मोठ्या रकमेला बोली लागली आहे. लिलावानंतर मुंबई इंडियन्सच्या (MI - Mumbai Indians) मालकीण निता अंबानी यांनी आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. निता अंबानी यांनी म्हटलं की, "आजचा दिवस महिलांसाठी ऐतिहासिक आहे. WPL महिला क्रिकेटमध्ये नक्कीच क्रांती घडवेल. महिलांना त्यांचं कौशल्य दाखवण्याची चांगली संधी मिळेल." त्यांनी पुढे सांगितलं की, "महिला किक्रेटसाठी हा फार खास दिवस होता. लिलावानंतर आम्ही फार खूश आहोत."
मुंबईत 14 फेब्रुवारी रोजी WPL चा लिलाव पार पडला. WPL लिलावामध्ये मुंबई इंडियन्स संघाची मालकीण आणि उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची पत्नी निता अंबानी (Nita Ambani) यांच्यासह त्यांचा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani), श्रीलंकन क्रिकेटपटू महेला जयवर्धन (Mahela Jayawardene), संघाचे मुख्य प्रशिक्षक चार्लोथ एटवर्डस, बॉलिंग कोस झुलन गोस्वामी, बँटिंग कोच देविका पालशिकर हे उपस्थित होते.
WPL Auction 2023 : महिला खेळाडूंचं स्वागत करताना निता अंबानी यांना आनंद
नीता अंबानी यांनी पुढे सांगितलं की, ''आमच्या मुंबई इंडियन्सच्या संघात पूजा वस्त्राकर आणि नॅट सीवर ब्रंटसारखे खेळाडू आहेत. या खेळाडूंनी अनेक मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. या दोन खेळाडूंचा माझ्या संघात समावेश करताना मला खूप आनंद होत आहे.'' याशिवाय नीता अंबानी आयपीएल (IPL) बाबतही प्रतिक्रिया दिली आहे.
WPL Auction 2023 : 'रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौरमध्ये बरेच साम्य'
नीता अंबानी यांनी सांगितलं की, रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौरमध्ये बरेच साम्य आहे. त्या म्हणाल्या, ''मी रोहित शर्माला एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून प्रगती करताना पाहिलं आहे. रोहित शर्मा गेल्या 10 वर्षांपासून मुंबई इंडियन्सच्या संघाचा एक भाग आहे. त्यानंतर आता आम्ही आमच्या मुंबई इंडियन्स कुटुंबात हरमनप्रीत कौरचे स्वागत करतो.''
त्यांनी पुढे सांगितलं की, ''रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौरमध्ये अनेक समानता आहेत. दोन्ही खेळाडू अनुभवी तसेच अतिशय व्यावसायिक आणि विजयी मानसिकता असणारे आहेत. रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर हे इतर युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहेत. दोन्ही खेळाडू माझ्या संघात असल्याने मला खूप आनंद झाला आहे.''
भारतीय महिला U19 संघाने सलग दोन वर्ष T20 वर्ल्ड कपवर भारताचं नाव कोरलं. याचं निता अंबानी यांनी कौतुक केलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, भारतीय महिला युवा खेळाडूंच्या विजयाचं संपूर्ण देशभरातून कौतुक होत असून फार उत्साहाचं वातावरण आहे. भारतील महिला संघालाही माझ्या शुभेच्छा. भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्याचं सामन्यात पाकिस्तानच्या संघाचा पराभव केला.
निता अंबानी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या सदस्य असणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. निता अंबानी यांनी म्हटलं आहेस की, महिला प्रीमियर लीग भारतीय खेळ जगतातील टर्निंग पॉईंट ठरेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :