VIDEO : डेव्हिड मिलर बाद नव्हता? सूर्यकुमारच्या निर्णायक झेलचा दुसरा अँगल समोर, क्लीन व्हिडीओने बोलती बंद!
Suryakumar Yadav Catch Controversy : विश्वचषकात सूर्यकुमारने घेतलेल्या कॅचवरुन सोशल मीडियावर वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळालं आता समोर आलेल्या नवीन व्हिडीओमध्ये मिलर बद असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
![VIDEO : डेव्हिड मिलर बाद नव्हता? सूर्यकुमारच्या निर्णायक झेलचा दुसरा अँगल समोर, क्लीन व्हिडीओने बोलती बंद! World Cup Suryakumar Yadav David Miller Catch Controversy T20 World Cup 2024 New Angle Video World Cup Suryakumar Catch New Clean Video After Controversy marathi newws VIDEO : डेव्हिड मिलर बाद नव्हता? सूर्यकुमारच्या निर्णायक झेलचा दुसरा अँगल समोर, क्लीन व्हिडीओने बोलती बंद!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/e44e670ddba0b87d6b04d7ebf982f34e1720106156747322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भारतीय संघाने (Team India) 17 वर्षांनंतर विश्वचषक जिंकून (T20 World Cup 2024) कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न सत्यात उतरवलं. सामना हातून गेला असं वाटत असतानाच सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) घेतलेल्या झेलने भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या आणि त्यानंतर अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर टीम इंडियाने विजय मिळवला. टी20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात सात धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात सूर्यकुमारने मिलरचा घेतलेल्या झेलमुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
सूर्यकुमारच्या निर्णायक झेलचा दुसरा अँगल समोर
या सामन्यानंतर सूर्याने झेललेल्या कॅचमध्ये डेव्हिड मिलर बाद नव्हता का? आणि सूर्याने घेतलेला झेल षटकार होता का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. या झेलचा आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरला झेलबाद केलं. या झेलमुळे टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यामुळेच सूर्याचं जोरदार कौतुक होताना दिसत आहे.
क्लीन व्हिडीओने बोलती बंद!
सोशल मीडियावर सूर्यकुमारच्या झेलवर शंका व्यक्त केली जात आहे. शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती. यावेळी आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज स्ट्राईकवर असल्यामुळे भारतीयांची चिंता वाढली होती. हार्दिक पांड्यावर गोलंदाजीची जबाबदारी देण्यात आली. या षटकातील पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरने षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण सीमा रेषेवर सूर्यकुमारने भन्नाट झेल पकडून मिलरला तंबूत धाडलं. यावेळी थर्ट अम्पायरने दिलेल्या निर्णयावर शंका सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे. झेल घेताना सूर्याचा पाय सीमा रेषेला लागल्याचा दावा केला जात आहे.
सूर्यकुमारच्या झेलचा क्लीन व्हिडीओ पाहा
Thoes who doubted Surya Kumar Yadav catch should watch this video.
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) July 4, 2024
Its a proof of cleanest catch. pic.twitter.com/C8FiJotir7
या झेलचा आता एक आणखी व्हिडीओ आता समोर आला आहे. सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरच्या घेतलेल्या कॅचच्या नवीन अँगलचा व्हिडीओ समोर आल्याने आता शंका घेणाऱ्यांची बोलती बंद झाली आहे. सूर्याच्या कॅचच्या समोर आलेल्या नवीन व्हिडीओच्या अँगलमध्ये सूर्या आणि त्याने घेतलेला झेल दिसत आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, झेलवेळी सूर्याचा पाय सीमा रेषेला लागला नव्हता, तर सीमा रेषेपासून दूर होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
VIDEO : ज्या मैदानावर छपरी-छपरीच्या घोषणा, त्याच वानखेडेवर हार्दिक पांड्याचा जयघोष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)