Points Table : पाकिस्तानच्या लाजीरवाण्या पराभवानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर, साहेब थेट तळाला
World Cup 2023 Points Table : अफगाण संघाने विश्वचषकात दुसऱ्यांदा मोठा उलटफेर केला आहे.
World Cup 2023 Points Table : अफगाण संघाने विश्वचषकात दुसऱ्यांदा मोठा उलटफेर केला आहे. पाकिस्तान संघाला पराभूत करत अफगाणिस्तान संघाने इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानच्या सनसनाटी विजयानंतर गुणातलिकेत मोठा उलटफेर झाला आहे. गतविजेता इंग्लंडचा संघ तळाला फेकला गेलाय. तर दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या अफगाणिस्तान संघाने थेट सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पाकिस्तान संघा अद्यापही पाचव्याच क्रमांकावर आहे, पण त्यांचा तिसरा पराभव झालाय.
गतविजेत्यांची अवस्था दैयनीय -
अफगाणिस्तान संघाने दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी इंग्लंडनंतर आता पाकिस्तानचाही पराभव केला. या विजयामुळे अफगाण संघ सहाव्या स्थानावर पोहचला आहे. गतविजेते इंग्लंड मात्र तळाला गेले आहेत. इंग्लंड संघाचे चार सामन्यात तीन पराभव झाले आहेत. गतविजेता इंग्लंड गुणतालिकेत दोन गुणांसह दहाव्या स्थानावर विराजमान आहे. गतविजेता इंग्लंडचा संघाची यंदाच्या विश्वचषकात दैयनीय अवस्था झाली आहे. इंग्लंडला चार सामन्यात तीन पराभवाचा सामना करावा लागला आहे.
पाकिस्तानला फटका -
आज पाकिस्तानचा लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे पाकिस्तान संघाचे विश्वचषकातील आव्हान अधिक खडतर झाले आहे. पाकिस्तानन संघ गुणातातिलेत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे, पण पाकिस्तानला पाच सामन्यात तीन पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा रनरेटही मोठ्या प्रमाणात घसरला आहे. अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यामुळे विश्वचषकातील आव्हान अधिक खडतर झाले आहे. विश्वचषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पाकिस्तानला उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल.
ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या स्थानावर पोहचला आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तानसह ऑस्ट्रेलियाचेही चार गुण झाले आहेत. पण सरस रनरेटमुळे ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकावर आहे.
तळाच्या संघाची स्थिती काय ?
बांगलादेशचा संघ सातव्या स्थानी पोहचला आहे. तर सातव्या क्रमांकावर असणारा नेदरलँड आठव्या स्थानी पोहचलाय. श्रीलंका संघ नवव्या क्रमांकावर आहे. बांगलादेश, नेदरलँड, श्रीलंका, इंग्लंड या संघाने आपापल्या चार सामन्यात तीन पराभव स्विकारले आहेत.
टीम इंडिया अव्वल स्थानावर -
न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघाने गुणातलिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. यंदाच्या विश्वचषकात टीम इंडिया आतापर्यंत अजय आहे. भारताने पाच सामन्यात पाच विजय मिळवले आहेत. किवी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंडने पाच सामन्यात चार विजय मिळवले आहेत. तर दक्षिण आफ्रिका सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
सर्वाधिक धावा विराटच्या नावावर -
यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. पाच सामन्यात विराट कोहलीने तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. विराट कोहलीने पाच सामन्यात 118 च्या सरासरीने 354 धावा चोपल्या आहेत. रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 5 सामन्यात 62.20 च्या सरासरीने 311 धावा चोपल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मोहम्मद रिझवान आहे. त्याने 302 धावा केल्या आहेत. रचित रविंद्र आणि ड्ररेल मिचेल तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या नावावर अनुक्रमे 290 आणि 268 धावा आहेत.
गोलंदाजीत मिचेल सँटनर 12 विकेटसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर जसप्रीत बुमराह 11 विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. मधुशंकाच्या नावावरही 11 विकेट आहेत. मॅट हेनरीने 10 विकेट घेतल्या आहेत.