एक्स्प्लोर

कोहलीचा कट्टर वैरी, ODI मध्ये दोन वर्षांनी वापसी; वर्ल्डकपमध्ये विराट अन् नवीन-उल-हक आमने-सामने

Naveen-Ul-Haq in Afghanistan Squad: अफगाणिस्तानच्या 15 सदस्यीय संघाचं कर्णधारपद हशमतुल्ला शाहिदीकडे सोपवण्यात आलं आहे. तर, कोहलीचा कट्टर वैरी नवीन-उल-हकचं वर्ल्डकपसाठी अफगाणिस्तानच्या संघात पुनरागमन झालं आहे.

Naveen-Ul-Haq in Afghanistan World Cup 2023 Squad: यंदा वर्ल्डकपचं (ICC World Cup 2023) यजमानपद भारताकडे आहे. 5 ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्डकपला सुरुवात होणार असून 19 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. सध्या टीम इंडिया (Team India) आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) खेळत आहे. आशिया कपनंतर टीम इंडिया वर्ल्डकप खेळणार आहे. अशातच वर्ल्डकपच्या चर्चांमध्ये एक चर्चा रंगली आहे ती, विराट कोहलीचा (Virat Kohli) कट्टर दुश्मन वर्ल्डकपमध्ये खेळणार असल्याची. आफगाणिस्तानच्या नवीन-उल-हकचं (Naveen-ul-Haq) वर्ल्डकपसाठी संघात पुनरागमन झालं आहे. विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यातील आयपीएल दरम्यानचा वाद सर्वश्रुत आहे. अशातच आशिया कपमध्ये विराट आणि नवीन एकमेकांसमोर येतील आणि टशन पाहायला मिळेल असं चाहत्यांना वाटलं होतं. पण आशिया चषकसाठी नवीन-उल-हकचा अफगाणिस्तानच्या संघात समावेश करण्यात आला नव्हता. पण आता वर्ल्डकपसाठी नवीनचं संघात पुनरागमन झालं आहे. त्यामुळे वर्ल्डकपच्या सामन्यात कोहली आणि नवीन यांच्यात टशन पाहायला मिळू शकतं. 

अफगाणिस्तानच्या 15 सदस्यीय संघाचं कर्णधारपद हशमतुल्ला शाहिदीकडे सोपवण्यात आलं आहे. त्याचबरोबर आशिया कप स्पर्धेत संघाचा भाग नसलेला 23 वर्षीय अष्टपैलू अजमातुल्ला उमरझाई यालाही विश्वचषक संघात स्थान मिळालं आहे. नवीन-उल-हकचे दोन वर्षांच्या कालावधीनंतर अफगाणिस्तान वनडे संघात पुनरागमन झालं आहे, तर वरिष्ठ अष्टपैलू खेळाडू गुलबदिन नायब सध्या चालू असलेल्या आशिया चषकात चांगली कामगिरी करूनही संघात नाही. आशिया चषक स्पर्धेत खेळणाऱ्या संघातून हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखालील या संघात चार बदल करण्यात आले आहेत. नायब नायब व्यतिरिक्त करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ आणि सुलेमान साफी या खेळाडूंनाही विश्वचषक संघातून वगळण्यात आलं आहे.

नवीन-उल-हकचं 2021 नंतर संघात पुनरागमन

अजमतुल्ला उमरझाई दुखापतीनंतर पुनरागमन अफगाणिस्तानच्या संघात करत आहे, तो दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर होता. 2021 मध्ये शेवटचा वनडे खेळणारा नवीन देखील संघात परतला आहे. नवीननं आतापर्यंत फक्त सात एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्यानं 25.42 च्या सरासरीनं 14 बळी घेतले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधून सहा वर्षांनंतर आशिया चषकासाठी परत बोलावलेल्या जनतला वगळण्यात आलं आहे.

1 मे 2023 रोजी लखनऊ येथे झालेल्या रॉयल चॅलेंजर्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यातील सामन्यानंतर नवीन-उल-हक प्रसिद्धीझोतात आला होता. याच सामन्यात लखनौकडून खेळताना नवीन विराट कोहलीशी भर मैदानात भिडला होता. नंतर या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातही वादही झाला होता. आता नवीनच्या पुनरागमनानं 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील विश्वचषक सामन्यानं पुन्हा एकदा उत्साहाला उधाण आलं आहे. 

अफगानिस्तान वर्ल्ड कप 2023 स्क्वॉड

हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरजई, राशिद खान, मुजीब-उर-रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, अब्दुल रहमान, नवीन-उल-हक. 

रिझर्व्ह खेळाडू : गुलबदीन नईब, शराफुद्दीन अशरफ और फरीद अहमद मलिक

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Prithvi Shaw Injury: पृथ्वी शॉच्या अडचणी वाढल्या; कित्येक महिने क्रिकेटपासून राहावं लागणार दूर, पण का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
Embed widget