Ind vs Aus Semi Final Schedule : ठरलं तर मग! कशीबशी सेमीफायनलमध्ये पोचलेली टीम इंडिया दिग्गज ऑस्ट्रेलियाशी भिडणार, जाणून घ्या शेड्युल अन् A टू Z
World Cup Semi Finals Schedule : महिला विश्वचषक 2025 आता आपल्या रोमांचक आणि निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. लीग स्टेजमधील सर्व सामने संपल्यानंतर आता स्पर्धेचा उपांत्य फेरीचा टप्पा सुरू होणार आहे.

ICC Women Cricket World Cup Semi Finals Schedule : महिला विश्वचषक 2025 आता आपल्या रोमांचक आणि निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. लीग स्टेजमधील सर्व सामने संपल्यानंतर आता स्पर्धेचा उपांत्य फेरीचा टप्पा सुरू होणार आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येतील. हे दोन्ही सामने जिंकणाऱ्या संघांमध्ये 2 नोव्हेंबर रोजी महिला विश्वचषकाची अंतिम लढत रंगणार आहे.
Clinical from the word go! 🤜🏻🤛🏻
— Star Sports (@StarSportsIndia) October 25, 2025
Australia continue their dominant run in CWC 2025 and now face India in the semis! 😍
WATCH THEM NEXT in #CWC25 👉 SEMI FINAL | #AUSvIND | THU, 30th OCT, 2 PM on Star Sports Network & JioHotstar pic.twitter.com/L69AHIX40i
कोणते संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलं?
या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी चार संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि भारत आहेत. दरम्यान, श्रीलंका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांगलादेश या संघांचा प्रवास लीग टप्प्यातच संपला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला सात गडी राखून पराभूत करत गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवले. ऑस्ट्रेलियाने सात पैकी सहा सामने जिंकले आणि 13 गुणांसह पहिल्या स्थानी राहिला. दक्षिण आफ्रिका 10 गुणांसह दुसऱ्या, इंग्लंड 9 गुणांसह तिसऱ्या, तर भारत 6 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला.
भारताचा आतापर्यंतचा प्रवास
भारतीय महिला संघाचे प्रदर्शन आतापर्यंत काही खास राहिले नाही. संघाने सहा सामन्यांपैकी तीन सामने जिंकले, तर तीन गमावले. भारताचा नेट रन रेट +0.628 असून संघाने चौथे स्थान मिळवले.
- भारत विरुद्ध श्रीलंका – भारताने 59 धावांनी विजय (30 सप्टेंबर)
- भारत विरुद्ध पाकिस्तान – भारताने 88 धावांनी विजय (5 ऑक्टोबर)
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – भारत तीन गडी राखून पराभूत (9 ऑक्टोबर)
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – भारत तीन गडी राखून पराभूत (12 ऑक्टोबर)
- भारत विरुद्ध इंग्लंड – भारत चार धावांनी पराभूत (19 ऑक्टोबर)
- भारत विरुद्ध न्यूझीलंड – भारताने 53 धावांनी विजय (23 ऑक्टोबर)
आता भारताचा लीग टप्प्यातील शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. उपांत्य फेरीपूर्वी भारतीय संघ या सामन्यात आपली तयारी अधिक भक्कम करण्याचा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोठ्या लढतीसाठी आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करेल.
हे ही वाचा -





















