(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Women's T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यास तर...? कसे असेल उपांत्य फेरीचे समीकरण
महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागणार आहे.
Team India Women's T20 WC 2024 : महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी संध्याकाळी शारजाहमध्ये सामना रंगणार आहे. टीम इंडियाचा हा शेवटचा ग्रुप सामना असणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यास पुढील मार्ग कठीण होईल. अशा स्थितीत भारताचे उपांत्य फेरीचे समीकरण कठीण होणार आहे.
अ गटातील गुणतालिकेवर नजर टाकली तर, ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. त्याने तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. त्याचे 6 गुण आहेत. भारताला हरवल्यास उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान निश्चित होईल. टीम इंडिया जिंकली तर त्यांना अशा असेल. भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. यामुळे नेट रन रेट ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला असेल. भारताचे सध्या 4 गुण आहेत, जे ऑस्ट्रेलियापेक्षा कमी आहे.
ऑस्ट्रेलियाने भारताला हरवल्यास काय होईल?
ऑस्ट्रेलियाने भारताला हरवल्यास अडचणी वाढतील. अशा स्थितीत भारताला न्यूझीलंड-पाकिस्तान सामन्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानला हरवण्याची प्रार्थना भारताला करावी लागेल. न्यूझीलंडचे दोन सामने बाकी आहेत. त्याचे 2 गुण आहेत. त्याचबरोबर रन रेटही मायनसमध्ये आहे. पाकिस्तानचा शेवटचा सामना बाकी आहे. त्याचे फक्त 2 गुण आहेत. श्रीलंकेचा संघ आधीच बाहेर पडला आहे.
ग्रुप-अ मध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन संघ आपले सर्व सामने जिंकून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. श्रीलंकेच्या महिला संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. या संघाने 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये संघांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याच कारणामुळे ती उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर आहे. न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंकेचा एक सामना बाकी आहे, ती केवळ औपचारिकता आहे.
भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर
महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत, त्यापैकी 2 जिंकले आहेत आणि एक गमावला आहे. संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे आणि त्याचा नेट रन रेट अधिक 0.576 आहे. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध अजून एक सामना बाकी असून तो 13 ऑक्टोबरला होणार आहे.
हे ही वाचा -
नव्या टीम इंडियाची अचनाक घोषणा; रॉबिन उथप्पा कर्णधार, पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध रंगणार!