(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Champions Trophy 2025 : पाकिस्तानला BCCI चा ठेंगा, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, टीम इंडिया या देशात खेळणार सामने
ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं (ICC Champions Trophy) आयोजन पुढील वर्षी पाकिस्तानात होणार आहे. पाकिस्तान (Pakistan) या स्पर्धेचं आयोजन 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान करणार आहे.
India Champions Trophy 2025 in Pakistan : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं (ICC Champions Trophy) आयोजन पुढील वर्षी पाकिस्तानात होणार आहे. पाकिस्तान (Pakistan) या स्पर्धेचं आयोजन 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान करणार आहे. आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाला ग्रीन सिग्नल दिला होता. पण भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार नसेल, तर सामने श्रीलंकामध्ये होऊ शकतात. भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये येणार की नाही? हे प्रकरण लवकर संपवावं असं वाटत आहे. आयसीसीची वार्षिक पत्रकार परिषद 19 जुलै रोजी कोलंबोत होणार आहे. त्यामध्ये हायब्रीड मॉडेलचा विषय अजेंड्यावर असेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला पाठवण्याबाबत बीसीसीआय किंवा भारत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. टीम इंडिया पाकिस्तानला जाण्याचा निर्णय फक्त भारत सरकारच्या हातात आहे, असे बीबीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी गेल्या महिन्यात स्पष्ट केले होते. दरम्यान, भारताने पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेतल्यास चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने श्रीलंकेत होणार असल्याचं समोर आले आहे.
ICC वेळापत्रकानुसार भारताचे सामने कुठे होणार ?
आयसीसीच्या वेळापत्रकानुसार भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अ गटामध्ये ठेवण्यात आले आहे, ज्यामध्ये यजमान पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे संघ देखील आहेत. ICC च्या त्या वेळापत्रकानुसार टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एकूण 8 संघटना सहभागी होणार आहेत. यजमान असल्याने पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला असता. 2023 एकदिवसीय विश्वचषकाचे यजमान देश सोडून इतर आयसीसी क्रमावारीतल अव्वल 7 संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरल्या असत्या. यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे.
याआधीही पाकिस्तानमध्ये जाण्यावरुन वाद
2023 आशिया चषकाचं यजमानपद पाकिस्तानकडेच होते. त्यावेळीही भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यावेळी Asian cricket council ने हायब्रिड मॉडेलनुसार, स्पर्धा घेतली होती. त्यानुसार, भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये झाले होते. त्यामुळे यजमानपद पाकिस्तानकडे असतानाही फायनल आणि सेमीफायनलचे सामने श्रीलंकामध्ये झाले होते.