Mohammed Shami Ind vs Eng 1st T20 : शमी 14 महिन्यांनी परतला, तरी संघात स्थान नाहीच, भारताच्या ढाण्या वाघाला गंभीरने ठेवलं बाहेर, जाणून घ्या कारण
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे.
India vs England 1st T20 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला प्लेइंग-11मध्ये जागा मिळाली नाही. जवळपास 14 महिन्यांनंतर शमी भारतीय संघात परतला आहे. पण त्याला मैदानावर उतरण्यासाठी वाट पहावी लागेल. कर्णधार सूर्या आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
A look at our Playing XI 🔽
— BCCI (@BCCI) January 22, 2025
Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/NHhYbQmNgf
मोहम्मद शमीला प्लेइंग-11ला मिळाले नाही स्थान!
2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपपासून मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बाहेर आहे. या स्पर्धेत त्याला दुखापत झाली होती. यानंतर, फेब्रुवारी 2024 मध्ये त्याने घोट्याची शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रियेनंतर शमी बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. यानंतर, त्याने काही काळासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळून आपल्या तंदुरुस्तीची टेस्ट घेतली आणि टीम इंडियामध्ये परतला. त्याची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघातही निवड झाली आहे. अशा परिस्थितीत, शमीला त्याचा फॉर्म परत मिळवण्यासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. पण त्याला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळाली नाही हे खूपच आश्चर्यकारक आहे.
टीम इंडियाची प्लेइंग-11 - अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंडची प्लेइंग-11 - बेन डकेट, फिल साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.
1st T20I. England XI: P Salt(wk), B Duckett, J Buttler (c), J Bethell, L Livingstone, H Brook, J Overton, G Atkinson, J Archer, A Rashid, M Wood. https://t.co/4jwTIC5zzs #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 22, 2025
हे ही वाचा -