Women's Asia Cup 2022 : महिला आशिया चषक आजपासून, भारतीय महिला श्रीलंकेविरुद्ध सामन्याने करणार स्पर्धेची सुरुवात
India vs Sri Lanka : पुरुष आशिया चषक स्पर्धा काही दिवसांपूर्वीच पार पडल्यानंतर आता आजपासून (1 ऑक्टोबर) महिला आशिया चषकाला बांग्लादेशमध्ये सुरुवात होत आहे.
India vs Sri Lanka Women's Asia Cup 2022 : नुकताच पुरुष आशिया चषक पार पडल्यानंतर आता आजपासून (1 ऑक्टोबर) महिला आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. बांग्लादेशमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत आज भारत आपला पहिला सामना श्रीलंका संघासोबत (India vs Sri Lanka) खेळणार आहे. 1 |ऑक्टोबरपासून 15 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होणार आहे.
भारत आणि श्रीलंका (India vs Australia) यांच्यातील आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघाचं पारडं जड दिसत आहे. कारण नुकतीच भारतानं इंग्लंडला मात दिली असून भारतीय महिला चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. पण पुरुष आशिया चषकाच्या सुरुवातीलाही श्रीलंका संघाला अनेकांनी जास्त महत्त्व दिलं नाही, पण श्रीलंकेने सर्वांना चकीत करत चषक जिंकला. त्यामुळे आजचा हा महिला सामनाही दमदार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर आजचा कुठे पाहता येईल याबद्दल जाणून घेऊ...
कधी आहे सामना?
आज अर्थात 1 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध श्रीलंका हा महिला आशिया कपमधील सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सामना सुरु होईल. त्याआधी अर्धातास नाणेफेक होणार आहे.
कुठे आहे सामना?
हा सामना बांग्लादेशच्या एसआयसीएस ग्राऊंड 2 (SICS Ground 2) येथे खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय संघ-
हरमनप्रीत (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, सबिनेनी मेघना, रिचा घोष (विकेटकिपर), स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंह, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, यादव, के.पी.नवगिरे.
राखीव खेळाडू- तानिया सपना भाटिया, सिमरन दिल बहादूर
श्रीलंकेचा संघ-
चमारी अथापथु (कर्णधार), हसीनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, कवीशा दिलहारी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), कौशानी नुथ्यंगना, ओशादी रणसिंघे, मालशा शेहानी, मदुशिका मेथथानंद, इनोका रणवीरा, रश्मि सिल्वा, सुगंधिका कुमारी, अचनी कुलाहारिका सेवंडी