IND vs NZ Live Streaming : आजपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात, कधी, कुठं पाहाल पहिला टी20 सामना?
IND vs NZ : टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आजपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेला सुरुवात होत आहे.

India vs New Zealand Match Live Streaming : टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेनंतर आता पुन्हा एकदा टीम इंडिया (Team India) मैदानात उतरणार आहे. भारतीय क्रिकेट संघ (Team India) सद्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात प्रत्येकी तीन टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान यावेळी संघात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून काही खेळाडू संघात पुनरागमनही करत आहेत. या सर्वांना घेऊन कुंग फू पांड्या अर्थात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) कर्णधार बनून मैदानात उतरणार आहे. भविष्यातील टी20 सामन्यांच्या दृष्टीनं ही मालिका महत्त्वाची असणार आहे. विशेष म्हणजे भारतीय संघात बदलाची शक्यता असून या मालिकेतून खेळाडूंचा खेळ तपासण्याची संधी बीसीसीआयकडे आहे. दरम्यान आज होणाऱ्या पहिल्या टी20 सामन्याबद्दलची माहिती जाणून घेऊ...
कधी होणार सामना?
भारतीय वेळेनुसार आजचा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना दुपारी 12 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे.
कुठे आहे सामना?
आजचा हा भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील पहिला टी20 सामना वेलिंग्टनच्या स्काय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
टी20 मालिकेसाठी कसा आहे भारतीय संघ?
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
कसं आहे टी-20 मालिकेच वेळापत्रक?
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 18 नोव्हेंबर | वेलिंग्टन |
दुसरा टी-20 सामना | 20 नोव्हेंबर | माउंट मॉन्गनुई |
तिसरा टी-20 सामना | 22 नोव्हेंबर | नॅपियर |
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
