IND vs BAN Live Streaming : बांगालादेशविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारत सज्ज, कधी कुठं पाहाल सामना?
IND vs BAN : टीम इंडिया न्यूझीलंडनंतर आता बांगलादेशच्या दौऱ्यावर पोहोचली असून आज दौऱ्यातील पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.
India vs Bangladesh Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आता न्यूझीलंड दौऱ्यानंतर थेट बांगलादेशला पोहोचला आहे. बांगलादेश दौऱ्यात भारत तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. भारताचा फुल टाईम कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली हे दिग्गजही या दौऱ्यात संघात परतले असून आहेत. हे सामने टीम इंडियासाठी 2023 मध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने (ODI World Cup 2023) महत्त्वाचे असतील. आगामी 50 षटकांच्या विश्वचषकासाठी भारत अधिकाधिक वन डे खेळणार आहे. ज्यातील तीन सामने या दौऱ्यात असून आज होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याबद्दलची माहिती जाणून घेऊ...
कधी होणार सामना?
भारतीय वेळेनुसार आजचा भारत विरुद्ध बांगलादेश सामना सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे.
कुठे आहे सामना?
आजचा हा भारत विरुद्ध बांगलादेश पहिला एकदिवसीय सामना बांगलादेशच्या ढाका येथील शेर ए बांग्ला क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत विरुद्ध बांगलादेश पहिला एकदिवसीय सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
भारताचा एकदिवसीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल ,वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
बांगलादेश एकदिवसीय संघ:
तमिम (कर्णधार), लिओन, इनामूल, शाकिब, मुशफिकुर, अफिफा, यासिर अली, मेहिदी, मुस्तफिझूर, तस्किन, हसन महमूद, इबादत, नसुम, महमुदुल्ला, शांतो आणि नुरुल हसन.
भारत विरुद्ध बांगलादेश वन डे सामन्यांचं वेळापत्रक
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 4 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
दुसरा एकदिवसीय सामना | 7 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
तिसरा एकदिवसीय सामना | 10 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
हे देखील वाचा-