एक्स्प्लोर

Ind vs Sa 1st Test : काय सुधारायचं... ऋषभ पंत संतापला! गौतम गंभीरनेही स्पष्टच सांगितले; सामना हरताच काय काय म्हणाले?

India vs South Africa 1st Test Marathi News : दक्षिण आफ्रिकेने भारतावर 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेत पहिला सामना 30 धावांनी जिंकला आहे.

India Lost Against South Africa 1st Test : दक्षिण आफ्रिकेने भारतावर 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेत पहिला सामना 30 धावांनी जिंकला आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया दुसऱ्या डावात फक्त 93 धावांवर गारद झाली. तिसऱ्या दिवसाच्या (16 नोव्हेंबर) दुसऱ्या सत्रातच सामना संपला. दक्षिण आफ्रिकेसाठी स्पिनर सायमन हार्मरने दोन्ही डावांत 4-4 असे एकूण 8 बळी घेत महत्त्वाची भूमिका बजावली. मालिकेतील दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीत होणार आहे. सामन्यानंतर ऋषभ पंतने सांगितले काय सुधारायचं? तर गौतम गंभीरने पराभवाचे कारण स्पष्टच सांगितले.

सामन्यानंतर ऋषभ पंत नेमकं काय म्हणाला? (What did Rishabh Pant say?)

ऋषभ पंत म्हणाला की "अशा प्रकारच्या सामन्यावर जास्त विचार करून काही फायदा नाही. हा स्कोर आम्ही सहज पार करू शकलो असतो. पण दुसऱ्या डावात आमच्यावर दबाव वाढला. टेम्बा आणि बॉश यांनी अप्रतिम भागीदारी केली आणि त्यातूनच ते पुन्हा सामन्यात परतले. 

पुढे तो म्हणाला की, विकेटवर मदत होती, 120 असा स्कोर कधी कधी अवघड ठरू शकतो. पण संघ म्हणून आपण दबाव झेलून परिस्थितीचा फायदा घ्यायला हवा होता. काय सुधारायचं आहे याबद्दल अजून विचार केलेला नाही, सामना नुकताच संपला आहे. पुढच्या वेळी आम्ही नक्कीच जोरदार पुनरागमन करू."

कोच गौतम गंभीर काय म्हणाला? (What did coach Gautam Gambhir say?)

भारतीय संघाच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे कोच गौतम गंभीर यांचे चेहरेवरील नाराजी स्पष्टपणे दिसत होती. त्यानेही स्पष्टच सांगितले की, आम्हाला अशीच खेळपट्टी हवी होती... पण आम्ही नीट खेळलो नाही, म्हणून असं झालं. 124 धावा सहज चेस करता येण्यासारख्या होत्या. 

टेम्बा बावुमाने कायम ठेवला विक्रम 

नाणेफेक जिंकल्यानंतर टेम्बा बावुमाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 159 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेतल्या. मात्र, भारतीय संघ पहिल्या डावात फक्त 189 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि केवळ 30 धावांची आघाडी घेतली.

दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेची अवस्था पुन्हा ढासळली आणि संपूर्ण संघ 153 धावांत गुडघे टेकला. त्यामुळे भारताला फक्त 124 धावांचे सोपे लक्ष्य मिळाले असे वाटत होते. पण भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार म्हणून टेम्बा बावुमा आतापर्यंत 11 कसोटी सामने खेळला आहे, त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने तब्बल 10 सामने जिंकले असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरी कसोटी 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळवली जाईल.

हे ही वाचा -

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभव; टीम इंडियाचं WTC चं गणित बिघडलं, Points Table मध्ये मोठी घसरण, आता श्रीलंकाही पुढे!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Hardik Pandya :  हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Embed widget