IND vs WI: भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा
इंग्लंडनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI ODI) यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे.
West Indies vs India: इंग्लंडनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI ODI) यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. येत्या 22 जुलै 2022 पासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडीज क्रिकेटनं 13 सदस्यीय संघाची निवड केली आहे. या मालिकेत निकोलस पूरन वेस्ट इंडीजच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, शाई होप उपकर्णधार असेल.
यापूर्वी बीसीसीआयनं वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय संघाची घोषणा केली होती. या मालिकेत रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांसारख्या वरीष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. रोहित शर्माच्या अनुपस्थित शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, रविंद्र जाडेजा उप-कर्णधार असेल.
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 22 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
दुसरा एकदिवसीय सामना | 24 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
तिसरा एकदिवसीय सामना | 27 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
(सर्व एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होतील.)
टी-20 मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 29 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
दुसरा टी-20 सामना | 1 ऑगस्ट 2022 | सेंट किट्स आणि नेव्हिस |
तिसरा टी-20 सामना | 2 ऑगस्ट 2022 | सेंट किट्स आणि नेव्हिस |
चौथा टी-20 सामना | 6 ऑगस्ट 2022 | फ्लोरिडा, अमेरिका |
पाचवा टी-20 सामना | 7 ऑगस्ट 2022 | फ्लोरिडा, अमेरिका |
(सर्व टी-20 सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होतील.)
भारताविरुद्ध वेस्ट इंडीजचा एकदिवसीय संघ
निकोलस पूरन (कर्णधार), साई होप (उपकर्णधार), शेमार ब्रुक, केसी कार्टी, जेसन होल्डर, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोटे, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जयडेन सील्स
राखीव:रोमेरो शेफर्ड आणि हेडन वॉल्श जूनियर
वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
हे देखील वाचा-