एमएस धोनी टी20 वर्ल्ड कप खेळणार? वीरेंद्र सहवाग आणि इरफान पठाण काय म्हणाले...
MS Dhoni : एमएस धोनीनं आयपीएल 2024 मध्ये शानदार फलंदाजीचं प्रदर्शन केलेय. विशेषकरुन अखेरच्या षटकामध्ये धोनीच्या बॅटमधून निर्णायक धावा निघत आहेत.
Virender Sehwag & Irfan Pathan On MS Dhoni : एमएस धोनीनं आयपीएल 2024 मध्ये शानदार फलंदाजीचं प्रदर्शन केलेय. विशेषकरुन अखेरच्या षटकामध्ये धोनीच्या बॅटमधून निर्णायक धावा निघत आहेत. धोनीच्या फिनिशिंगनं पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहेत. आयपीएलच्या 17 व्या हंगामात धोनीला अद्याप एकाही गोलंदाजाला बाद करता आलेले नाही. आठ सामन्यापैकी धोनी सहावेळा फलंदाजीला उतरला अन् नाबाद माघारी परतला. धोनी यंदाच्या हंगामात 35 चेंडूचा सामना केलाय, त्यामध्ये 91 धावा चोपल्या आहेत. धोनीची कामगिरीपाहून अनेकांनी टी20 विश्वचषकात खेळावं अशी मागणी केली आहे. सोशल मीडियावर धोनीच्या फलंदाजीची जोरजार चर्चा सुरु आहे. आजी-माजी खेळाडू धोनीचीच चर्चा करत आहे. धोनीनं विश्वचषकात टीम इंडियासाठी पुन्हा खेळावं, अशी मागणी चाहत्यांनी केली. माजी क्रिकेटरलाही धोनीला पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीमध्ये पाहायचेय.
टी20 वर्ल्ड कपसाठी धोनीची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार ?
वीरेंद्र सहवाग, इरफान पठान आणि वरूण आरोन यासारख्या माजी खेळाडूंच्या मते, टी20 विश्वचषकासाठी धोनीची वाइल्ड कार्ड इन्ट्री व्हायला हवी. लखनौ आणि चेन्नईच्या सामन्यादरम्यान समालोचन करताना इरफान आणि वीरेंद्र सहवाग यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. इरफान पठाण म्हणाला की, "एमएस धोनीने टी20 विश्वचषकात खेळण्याचा निर्णय घेतला तरच कुणीच नाही म्हणणार नाही. पण असं होईल असं मला वाटत नाही. जर झालं तर कुणाचाच विरोध नसेल." यावेळी बोलताना वीरेंद्र सहवाग यानेही धोनीचं कौतुक केले. सहवाग म्हणाला की, यंदाच्या हंगामात धोनी 250 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. धोनी आतापर्यंत नाबाद राहिलाय.टी 20 विश्वचषकात धोनीपेक्षा चांगला विकेटकीपर कोण असू शकतं?
धोनीबद्दल रोहित शर्मा काय म्हणाला होता ?
गेल्या आठवड्यात रोहित शर्मानं एमएस धोनीबाबत एक वक्तव्य केले होते. यंदाच्या विश्वचषकात कोणत्या विकेटकीपरला संधी दिली जाईल? असा प्रश्न रोहित शर्माला विचारण्यात आला होता. रोहित शर्मा म्हणाला की.." धोनीची मनधरणी करणं कठीण जाईल. पण धोनी अमेरिकेत येत आहे, क्रिकेट खेळण्यासाठी नाही तर गोल्फ खेळण्यासाठी... " रोहित शर्माच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला जोर आलाय.