Virender Sehwag : युझवेंद्रच्या घटस्फोटाची चर्चा, आता वीरेंद्र सेहवागचाही काडीमोड? तब्बल वीस वर्षानंतर संसार मोडणार?
Virender Sehwag Devorce Rumours : आधी युझवेंद्रच्या घटस्फोटाची चर्चा, आता वीरेंद्र सेहवागचीही काडीमोड? तब्बल वीस वर्षानंतर संसार मोडणार?
Virender Sehwag Devorce Rumours : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री यांनी घटस्फोट घेतल्याची चर्चा गेल्या आठवड्यांपासून सुरु आहे. दरम्यान, चहलबाबत चर्चा सुरु असतानाच आता भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वीरेंद्र सेहवागच्या काडीमोडाबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत हे दोघे 20 वर्षांच्या संसारानंतर वेगळं होणार असल्याचे बोलले जात आहे. दोघांचा 2004 मध्ये विवाह संपन्न झाला होता. दोघांनीही इन्स्टाग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन एकमेकांना अनफॉलो केलंय. त्यामुळे सेहवाग घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरु झालीये. दोघे अनेक दिवसांपासून वेगळे राहात आहेत आणि घटस्फोट घेणार आहेत, अशी माहिती कुटुंबातील सूत्रांनी दिली आहे. याबाबतचं वृत एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलं आहे.
वीरेंद्र सेहवान हा त्यांच्या मैदानावर फटकेबाजीमुळे संपूर्ण देशाला परिचित आहे. शिवाय लग्न झाल्यानंतर सेहवागला दोन मुलं देखील झाली आहेत. सेहवागला पहिला मुलगा 2007 मध्ये झाला होता. त्याचं नाव आर्यवीर असं ठेवण्यात आलं होतं. तर 2010 मध्ये सेहवागच्या पत्नीने दुसऱ्या मुलाची गोड बातमी आली होती. त्याचं नाव सेहवागने वेदांत असं ठेवलं होतं. दरम्यान, तब्बल 20 वर्षे सोबत घालवल्यानंतर सध्या वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत वेगळं होणार असल्याच्या चर्चा आहेत. दिवाळी दरम्यान, चाहत्यांना सेहवागच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदा कुणकुण लागली होती. वीरेंद्र सेहवागने दिवाळीत त्यांच्या दोन्ही मुलांसह आणि आईसोबत फोटो शेअर केले होते. मात्र, यामध्ये आरती कोठेही नव्हती. शिवाय तिला सेहवागने मेंशन देखील केले नव्हते. त्यामुळे सेहवागच्या घटस्फोटाबाबतच्या चर्चांनी जोर धरला होता.
दोन दिवसांपूर्वी वीरेंद्र सेहवागने Palakkad मधील Vishwa Nagayakshi मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्याने इन्स्टाग्रामवर फोटोही शेअर केले आहेत. याही पोस्टमध्ये त्याची पत्नी आरती त्याच्या सोबत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, घटस्फोटाबाबतच्या चर्चांवर वीरेंद्र सेहवागकडून अद्याप कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावरील चर्चांमुळे चाहत्यांमध्ये सेहवागच्या घटस्फोटाबाबत चर्चा रंगल्या आहेत.
सेहवागची पत्नी आरती अहलावत ही मूळची नवी दिल्लीची आहे. 16 डिसेंबर 1980 रोजी आरतीचा जन्म झाला. चहलच्या पत्नीप्रमाणे सोशल मीडियावर आरती फार चर्चेत नसते. तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा पूर्ण केलाय. त्यापूर्वी तिने लेडी इर्विन माध्यमिक विद्यालय आणि भारतीय विद्या भवन येथे शिक्षण घेतलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या