एक्स्प्लोर

Virat Kohli Century Ind vs Aus 1st Test : 491 दिवसांनी संपली प्रतीक्षा! ‘किंग कोहली’चा धमाका, पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकले शतक

Ind vs Aus 1st Test : अखेर प्रतीक्षा संपली, पर्थमध्ये किंग कोहलीची जादू पाहायला मिळाली.

Virat Kohli Century Ind vs Aus 1st Test : अखेर प्रतीक्षा संपली, पर्थमध्ये किंग कोहलीची जादू पाहायला मिळाली. पहिल्या डावात अवघ्या पाच धावांवर बाद झालेल्या विराट कोहलीने पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात जोरदार पुनरागमन केले. विराट कोहलीने 94 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर तुफानी फलंदाजी करताना शतक ठोकले. जैस्वाल आऊट झाल्यानंतर विराट कोहलीने भारतीय डाव सांभाळून आपल्या चाहत्यांना शतकाची भेट दिली.  

बराच काळ खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीने टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर देत शतक झळकावले. विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 30 वे शतक ठोकले आहे. मोठी गोष्ट म्हणजे विराट कोहलीने 491 दिवसांनंतर कसोटी फॉरमॅटमध्ये शतक ठोकले आहे. विराटने यापूर्वी 20 जुलै 2023 रोजी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये शतक झळकावले होते, आता पर्थमध्ये त्याने आपल्या बॅटने शतक केले आहे.

पर्थ कसोटीत टीम इंडियाचा डंका!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. त्याने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात पकड घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 150 धावांत गारद झाला. यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाचा डाव 104 धावांत गुंडाळला आणि 46 धावांची आघाडी घेतली. यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात विराट कोहलीचे शतक, यशस्वी जैस्वालच्या 161 धावा आणि केएल राहुलच्या 77 धावांच्या जोरावर मोठी आघाडी घेतली.

कोहली सतत ठरत होता अपयशी...  

कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात शेवटचे अर्धशतक झळकावले. पुण्यात त्याला 1 आणि 17 धावाच करता आल्या. मुंबई कसोटीतही कोहली फेल ठरला होता. पहिल्या डावात 4 धावा आणि दुसऱ्या डावात 1 धावा करून तो बाद झाला. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात 5 धावा करणाऱ्या विराटने दुसऱ्या डावातही शानदार फलंदाजी केली.

ऑस्ट्रेलियात विराटचा विक्रम

या कसोटी सामन्यापूर्वी कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर सहा शतके झळकावली होती. 13 सामन्यात 54.08 च्या सरासरीने 1352 धावा केल्या. यावरून त्यांचे वर्चस्व समजू शकते. यावेळी त्याला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये आणखी चांगली कामगिरी करायची आहे. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने हे सिद्ध केले. त्याची नजर या मालिकेत भरघोस धावा करण्यावर आहे.

हे ही वाचा -

Rishabh Pant : अपघातातून वाचावणाऱ्या देवदूतांना पंतकडून खास गिफ्ट! लाखो लोकांनी ठोकला सलाम; व्हिडिओ समोर आला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Nitesh Rane : मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole | Jaykumar Gore | कचाट्यात गोरे, पवारेंचे मोहरे? गोरेंच्या बचावासाठी फडणवीस मैदानातSpecial Report | Kunal Kamra Video | कुणाल कामराचा नवा व्हिडीओ, शिवसेनेला पुन्हा डिवचलंDmart Marathi Language Issue News | 'नाही येत मराठी..', परप्रांतीयांकडून माज, मनसैनिकांनी दाखवला 'मराठी' इंगाSpecial Report | Waghya Dog Statue Issue | 'वाघ्या'चं कारण, जातीवरुन राजकारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Nitesh Rane : मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
Maharashtra Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस, 23 दिवसांत कोणत्या महत्त्वाच्या घोषणा झाल्या, सर्वसामान्यांना नेमकं काय मिळालं?
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस, 23 दिवसांत कोणत्या महत्त्वाच्या घोषणा झाल्या, सर्वसामान्यांना नेमकं काय मिळालं?
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
Maharashtra Live: सोलापूरमध्ये शाळेत लहानग्या मुलीवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार
Maharashtra Live: सोलापूरमध्ये शाळेत लहानग्या मुलीवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
Embed widget