Virat Kohli Ranji Trophy : गौतम गंभीर अन् BCCI ने विराट कोहलीचा केला टप्प्यात कार्यक्रम; चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी घेतला मोठा निर्णय
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये फेल ठरला.
Virat Kohli Set To Play In Ranji Trophy : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये फेल ठरला. पहिल्या सामन्यात त्याने शतक झळकावले, पण त्यानंतर त्याचा फॉर्म कुठे तरी गायब झाला. धावा काढणे तर दूरच, क्रीजवर पण तो जास्त काळ टिकू शकला नाही. मालिकेत बहुतेक वेळा तो ऑफ स्टंप बॉलवर खेळताना आऊट झाला. ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या 1-3 अशा पराभवानंतर कोच गौतम गंभीर आणि बीसीसीआयने खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक केले आहे. आता प्रत्येक मालिका संपताच थेट लंडनवारी करणाऱ्या विराट कोहलीने पण मोठा निर्णय घेतला आहे.
कोहली रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास सज्ज
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विराट कोहलीलाही भारतीय संघात संधी मिळाली आहे. आता या मोठ्या स्पर्धेपूर्वी, तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळून लय मिळवू इच्छितो. विशेष म्हणजे त्याने 30 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दिल्लीच्या रेल्वेविरुद्धच्या सामन्यासाठी स्वतःला उपलब्ध करून दिले आहे. हा सामना फक्त दिल्लीच्या मैदानावर खेळवला जाईल. जे त्यांचे होमग्राउंड देखील आहे. 2012 मध्ये तो दिल्लीकडून उत्तर प्रदेशविरुद्ध रणजी ट्रॉफी सामना खेळला होता.
Virat Kohli will be playing his first Ranji Trophy match after 12 years.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 20, 2025
- 30th January Vs Railways. 🫡🇮🇳 pic.twitter.com/DF6QabYAXz
दुखापतीमुळे विराट कोहली 23 जानेवारीपासून सौराष्ट्र विरुद्ध दिल्लीच्या आगामी सामन्यात खेळू शकणार नाही, परंतु त्याने दिल्ली क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) ला कळवले आहे की तो रणजी ट्रॉफीमधील संघाच्या शेवटच्या लीग सामन्यात खेळेल. खेळण्यासाठी उपलब्ध असेल. दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी पीटीआयला सांगितले की, विराटने डीडीसीए अध्यक्ष (रोहन जेटली) आणि संघ व्यवस्थापनाला रेल्वेविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असल्याचे कळवले आहे.
विराट कोहलीची गणना भारतातील महान खेळाडूंमध्ये केली जाते. एकदा तो क्रीजवर स्थिरावला की, तो मोठी खेळी खेळतो. आतापर्यंत त्याने त्याच्या कारकिर्दीत एकूण 155 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि या काळात त्याच्या बॅटमधून 11479 धावा आल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 37 शतके आहेत. त्याचा सर्वोच्च धावसंख्या 254 धावा आहे. दुसरीकडे, त्याने 329 लिस्ट-ए क्रिकेट सामन्यांमध्ये 15347 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 54 शतके झळकावली आहेत.
हे ही वाचा -