IND vs AUS : अहमदाबाद कसोटीत विराटचं अनोखं 'त्रिशतक', अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय
IND vs AUS : विराट कोहली (Virat Kohli) याने अहमदाबाद टेस्टमध्ये (Ahmedabad Test) एक अनोख्या प्रकारचं त्रिशतक पूर्ण केलं असून अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय आहे.
IND vs AUS 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील चौथ्या कसोटीत (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाने 480 धावांची मोठी धावसंख्या उभारली असून सध्या ऑस्ट्रेलिया सामन्यात ड्रायव्हिंग सीटवर दिसत आहेत. भारताची फलंदाजी सुरु झाली असून भार 36 धावांवर आहे. दरम्यान या सामन्यात भारताची गोलंदाजी सुरु असताना टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात फलंदाजी न करता देखील एक खास त्रिशतक ठोकलं आहे.
विराटने पूर्ण केले 300 झेल
विराट कोहलीने (Virat KohlI) नॅथन लियॉनचा झेल घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 300 झेल पूर्ण केले आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीतील एकदिवसीय-कसोटी आणि टी-20 सह 494 वा सामना खेळला आहे. ज्यामध्ये त्याने आतापर्यंत 299 झेल घेतले होते. पण आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 झेल पूर्ण झाले आहेत. 300 झेल पूर्ण होताच विराट कोहलीने कॅचचं त्रिशतक पूर्ण केले आहे. अश्विनच्या चेंडूवर त्याने स्लिप्समध्ये नॅथन लायनचा अप्रतिम झेल घेतला. अहमदाबाद कसोटीत त्याने ही कामगिरी केली. 300 झेल घेणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे, त्याच्या आधी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ही कामगिरी केली होती. द्रविडने 334 झेल घेतले आहेत. सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत विराट कोहली सातव्या स्थानावर आहे.
सर्वाधिक झेल पकडणारे खेळाडू
- महिला जयवर्धने – 440
- रिकी पाँटिंग – 364
- रॉस टेलर – 351
- जॅक कॅलिस – 338
- राहुल द्रविड – 334
- स्टीफन फ्लेमिंग – 306
- विराट कोहली – 300
- ग्रॅमी स्मिथ – 292
- मायकेल वॉ - 289
- ब्रायन लारा – 284
ख्वाजा, ग्रीनचं शतक तर अश्विननं घेतल्या 6 विकेट्स
उस्मान ख्वाजा आणि कॅमरुन ग्रीन यांच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात 480 धावांचा डोंगर उभारला. भारताकडून आर अश्विन याने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने बिनबाद 36 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 16 तर शुभमन गिल 17 धावांवर खेळत आहेत. भारत अद्याप 444 धावांनी पिछाडीवर आहे.
अश्विनचाही खास रेकॉर्ड
अश्विननं एका डावात 6 विकेट्स घेत आणखी एक 5 Wickets Haul हाऊल अर्थात एका डावात पाच विकेट घेण्याचा खास रेकॉर्ड केला आहे. अश्विननं 26 व्या वेळेस घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात एका डावात 5 हून अधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला. त्याने अनिल कुंबळेचा घरच्या मैदानावर सर्वाधिक वेळा 5 हून अधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड मोडला. कुंबळेनं ही कामगिरी 25 वेळा केली होती. विशेष म्हणजे अश्विननं 55 वा कसोटी सामना घरच्या मैदानावर खेळताना ही कामगिरी केली असून कुंबळेने ही कामगिरी 63 सामन्यात केली होती.
हे देखील वाचा-