एक्स्प्लोर

Virat Kohli : 'वेळ आली आता नारळ देण्याची...' खराब कामगिरीनंतर विराट कोहली घेणार निवृत्ती? लंडनला होणार शिफ्ट?

India vs New Zealand 2ND Test : सध्या टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे.

India vs New Zealand 2ND Test : सध्या टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडिया पराभवाच्या छायेत आहे. यजमान संघाकडून अनुभवी फलंदाज विराट कोहली दोन्ही डावात फ्लॉप ठरला. एकीकडे विराट कोहलीने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात केवळ एक धाव घेतली, तर दुसरीकडे दुसऱ्या डावातही अनुभवी फलंदाज आपली छाप सोडू शकला नाही आणि 17 धावा करून बाद झाला.

गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीची कामगिरी अत्यंत खराब आहे. त्याला काही सामन्यांमध्ये सुरुवात तर मिळत आहे पण त्याचे रूपांतर मोठ्या धावसंख्येमध्ये करता आलेले नाही. दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात मिचेल सँटनरने विराट कोहलीला आपला शिकार बनवले.

विराट कोहलीवर सोशल मीडियावर जोरदार टीका  

आता सोशल मीडियावर विराट कोहलीवर जोरदार टीका होत आहे. विराट कोहलीने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन कायमचे लंडनला जावे, असे अनेकांचे मत आहे. खरंतर विराट कोहलीचेही लंडनमध्ये एक घर आहे आणि तो तिथेच जास्त वेळ घालवताना दिसतो.

टीम इंडियाने पहिल्या डावात खराब फलंदाजी करत केवळ 156 धावा केल्या होत्या. आता त्यांना हा सामना जिंकण्यासाठी 359 धावांची गरज आहे. पण कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक 8 धावांवर बाद झाला तर शुभमन गिलने केवळ 23 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने टीम इंडियासाठी शानदार फलंदाजी करत 77 धावांचे योगदान दिले. मात्र, त्याच्याशिवाय टीम इंडियाच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला या सामन्यात मोठी धावसंख्या करता आली नाही.

ऋषभ पंतही खाते न उघडता धावबाद झाला तर वॉशिंग्टन सुंदरने 21 धावा केल्या. सर्फराज खानने 9 धावांचे योगदान दिले. टीम इंडियाला या मालिकेत टिकायचे असेल तर हा सामना जिंकणे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मात्र, यजमानांना हा सामना जिंकणे फार कठीण दिसत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSantosh Deshmukh Beed : संतोष देशमुख हत्येचं प्रकरण, जातीयवादाचं वळण Rajkiya Sholey Special ReportFadnavis Varsha Bungalow : वर्षा बंगला,काळी जादू अन् टोपलीभर लिंबू Rajkiya Sholey Special ReportShivraj Rakshe Maharashtra Kesari : आखाड्यात कुस्ती हरली? राजकीय आखाडा कुणामुळे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
Embed widget