Virat Kohli : हुश्श... विराट कोहलीने पहिली धाव काढताच सिडनीचं अख्खं मैदान नाचायला लागलं, शून्याची साडेसाती संपली, पाहा Video
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे.

Virat Kohli celebrates First Run vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतासमोर 236 धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान, पर्थ आणि अॅडलेड येथील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खातेही उघडू न शकलेला विराट कोहली, सिडनीतील या निर्णायक सामन्यात मात्र दमदार फॉर्ममध्ये दिसला आणि शानदार सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताने 100 धावांचा टप्पा गाठला आहे. रोहित शर्मा त्याच्या अर्धशतकाच्या जवळ आहे आणि कोहली त्याला चांगली साथ देत आहे.
A fun 1 from Virat Kohli 😆#AUSvIND pic.twitter.com/hMpwBxticI
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 25, 2025
विराट कोहलीने पहिली धाव काढताच सिडनीचं अख्खं मैदान नाचायला लागलं
पहिल्या विकेटचा धक्का बसल्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. क्रीजवर त्याच्यासोबत रोहित शर्मा होता. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विराटला एकही धाव करता आली नव्हती, पण या सामन्यात ज्या क्षणी त्याने अखेर खाते उघडले, आणि शून्याची साडेसाती संपली. विराट कोहलीने पहिली धाव काढताच सिडनीचं अख्खं मैदान नाचायला लागलं. प्रेक्षकांप्रमाणेच कोहलीलाही आपला आनंद लपवता आला नाही, त्यानेही हसत आपला आनंद व्यक्त केला. त्यानंतर विराटची बॅट तलवारीसारखी फिरायला लागली, त्याने एकापाठोपाठ खणखणीत चांगले शॉर्ट मारले. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जोडीला मैदानात पाहून प्रेक्षक बेभान झाले आहेत.
So many emotions! ☺️🥹❤️
— Star Sports (@StarSportsIndia) October 25, 2025
He’s off the mark & the crowd has made its happiness loud and clear! 🙌
Will we witness a Chase Master special from #ViratKohli tonight? 🔥#AUSvIND 👉 3rd ODI | LIVE NOW 👉 https://t.co/0evPIuANAu pic.twitter.com/SZiBRnnvUY
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 237 धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा संघ 46.4 षटकांत 236 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून मॅट रेनशॉने अर्धशतक झळकावले आणि 56 धावा केल्या. भारताचे नेतृत्व वेगवान गोलंदाज हर्षित राणाने केले आणि चार विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.
हे ही वाचा -





















