Virat Kohli : हे देवा... कोहलीचं आता काय करायचं? पुन्हा पुन्हा एकच चूक, आकडेवारी पाहून तुम्हीही डोकं धराल
India vs Australia 5th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शेवटचा कसोटी सामना सिडनी येथे खेळला जात आहे.
Virat Kohli Out On Off Stump Ball In Sydney Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia 5th Test) यांच्यात शेवटचा कसोटी सामना सिडनी येथे खेळला जात आहे. या सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा तीच चुक केली. जेव्हा संघाला कोहलीकडून मोठी खेळीची अपेक्षा होती, तेव्हा विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहलीची विकेट पडल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. आता सोशल मीडियावर यूजर्स कोहलीवर जोरदार टीका करत आहेत.
सिडनी कसोटीत विराट कोहली ज्या प्रकारे बाद झाला, तो बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळाला नाही. खरं तर, विराट आतापर्यंत त्याच्या 8 डावांपैकी 7 वेळा याच पद्धतीने बाद झाला आहे. यावेळी हरव्या खेळपट्टीवर बाऊन्सने कोहलीलाही त्रास दिला. पण पुन्हा एकदा बोलंडने टाकलेल्या स्टंपबाहेरील चेंडूवर विराटने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन मागे तिसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या बियू वेबस्टरच्या हातात गेला. अशाप्रकारे कोहली पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहलीने 69 चेंडूत एकही चौकार न मारता 17 धावांची खेळी केली.
पहिल्याच चेंडूवर मिळाले होते जीवदान
कोहली जेव्हा फलंदाजीसाठी क्रिजवर आला होता, तेव्हा पहिल्याच चेंडूवर कोहलीला जीवदान मिळाले. पहिल्याच चेंडूवर कोहली स्लिपमध्ये जवळपास झेलबाद झाला होता. क्षेत्ररक्षकाने झेल घेतला होता, पण स्टीव्ह स्मिथने जमिनीलगच झेल घेताना चेंडू खाली मैदानाला स्पर्श झाल्याचे दिसल्याने विराटला नाबाद घोषित करण्यात आले. त्यामुळे पहिल्याच चेंडूवर त्याला जीवदान मिळाले. यानंतर किंग कोहली शानदार खेळी खेळेल, अशी आशा चाहत्यांना होती, मात्र तसे झाले नाही.
Extra bounce from Hazlewood - Kohli's back in the sheds for five #AUSvIND pic.twitter.com/6M5DjgOqrV
— cricket.com.au (@cricketcomau) November 22, 2024
बुमराह सिडनी कसोटीत भारताचा कर्णधार
सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटीत जसप्रीत बुमराह टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. खराब फॉर्ममुळे रोहितला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
हे ही वाचा -