एक्स्प्लोर

यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 

T20 World Cup 2024 : विराट कोहलीसाठी टी20 विश्वचषक 2024 एखाद्या वाईट स्वप्नासारखा जात आहे. सात सामन्यात विराट कोहलीच्या बॅटमधून एकही अर्धशतक निघाले नाही.

IND vs ENG, T20 World Cup 2024 : विराट कोहलीसाठी टी20 विश्वचषक 2024 एखाद्या वाईट स्वप्नासारखा जात आहे. सात सामन्यात विराट कोहलीच्या बॅटमधून एकही अर्धशतक निघाले नाही. विराट कोहलीला उपांत्य सामन्यातही मोठी खेळी करता आलेली नाही. टी20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात विराट कोहली पहिल्यांदाच फ्लॉप गेलाय. याआधी झालेल्या तीन सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक ठोकले होते. पण आज (गुरुवार, 27 जून) विराट कोहली फक्त 9 धावा काढून तंबूत परतला. विराट  कोहलीला यंदाच्या विश्वचषकात 100 धावाही करता आलेल्या नाहीत, त्याची सर्वोच्च धावसंख्या 37 इतकी आहे. 

विराट कोहलीला यंदाच्या विश्वचषकात अद्याप एकही अर्धशतक ठोकता आलेली नाही. स्पर्धेत त्याला फक्त दोन वेळा दुहेरी धावसंख्या करता आली आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या फक्त 37 इतकी आहे. बांगलादेशविरोधात 24 आणि अफगाणिस्तानविरोधात 37 धावा.. दोनवेळा त्याला दुहेरी धावसंख्या करता आली. विश्वचषकात विराट कोहली दोन वेळा शून्यावर तंबूत माघारी जावं लागलेय. आज झालेल्य उपांत्य सामन्यात विराट कोहलीला दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. रीस टोप्लीने विराट कोहलीला फक्त नऊ धावांवर त्रिफाळाचीत केले. याआधी टी20 विश्वचषकाच्या प्रत्येक उपांत्य सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक टोकलेय. पहिल्यांदाच विराट कोहली फ्लॉप ठरलाय. 

विराट कोहली पहिल्यांदाच फ्लॉप -

विराट कोहलीने टी-20 विश्वचषक 2014 मध्ये पहिल्यांदा उपांत्य सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने 44 चेंडूत 72 धावांची नाबाद खेळी केली होती. विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली होती.  त्यानंतर 2016 मध्येही टीम इंडिया टॉप-4 मध्ये पोहोचली होती. उपांत्य फेरीत भारताचा सामना वेस्ट इंडिजशी झाला होता. यावेळी विराटने 47 चेंडूत 89 धावा केल्या होत्या. पण या सामन्यात बारताचा सात गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. 

2022 टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांचा आमनासामना झाला होता. त्या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने 40 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. भारताने 168 धावा केल्या होत्या. पण या सामन्यात इंग्लंडने भारताचा दारुण पराभव केला होता.  2024 च्या टी20 विश्वचषकात विराट कोहली फ्लॉप गेला. विराट कोहलीला अर्धशतक ठोकता आले नाही. 

टी20 विश्वचषकात विराट फ्लॉप

टी20 विश्वचषकात विराट कोहली फ्लॉप ठरला. विराट कोहलीला संपूर्ण स्पर्धेत 100 धावाही करता आल्या नाहीत. विराट कोहलीला सात सामन्यात फक्त 75 धावाच करता आल्यात. सात सामन्यात विराट कोहली दोन वेळा शून्यावर बाद झाला. तर 3 सामन्यात विराट कोहलीला दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. विराट कोहलीला फक्त दोन वेळा दुहेरी धावसंख्या पार करता आली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA T20 World Cup: वर्ल्डकप जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींचा टीम इंडियाला फोन, रोहित शर्माला म्हणाले...
भारताने विश्वचषक जिंकताच पंतप्रधान मोदींनी बार्बाडोसला फोन फिरवला, रोहित-विराटला म्हणाले...
Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pandharpur Wari : पंढरपूर येथील भक्तनिवासांमध्ये भाविकांना  नाश्ता , जेवण  कमी दरात  मिळणारABP Majha Headlines :  10:00AM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai T 20 World cup  : T 20 विश्वचषकावर भारताचं दुसऱ्यांदा नाव; दादरच्या शिवाजी पार्कात जल्लोषABP Majha Headlines :  9:00AM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA T20 World Cup: वर्ल्डकप जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींचा टीम इंडियाला फोन, रोहित शर्माला म्हणाले...
भारताने विश्वचषक जिंकताच पंतप्रधान मोदींनी बार्बाडोसला फोन फिरवला, रोहित-विराटला म्हणाले...
Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
दीड दिवस पाणी घेतलं नाही, भुजबळांसह पंकजाताईंनी फोन केले, माझा कट्ट्यावर लक्ष्मण हाकेंनी सांगितली उपोषणाची स्टोरी
दीड दिवस पाणी घेतलं नाही, भुजबळांसह पंकजाताईंनी फोन केले, माझा कट्ट्यावर लक्ष्मण हाकेंनी सांगितली उपोषणाची स्टोरी
Hardik Pandya: त्या एका गोष्टीमुळे व्हिलन ठरेलला हार्दिक पांड्या अखेरच्या षटकात हिरो ठरला, भरमैदानात रोहित शर्माने कुंफू पांड्याचा गालगुच्चा घेतला
त्या एका गोष्टीमुळे व्हिलन ठरेलला हार्दिक पांड्या हिरो ठरला, भरमैदानात रोहित शर्माने कुंफू पांड्याचा गालगुच्चा घेतला
Embed widget