Vinod Kambli Viral Video : वाईट काळात बायकोने विनोद कांबळीचा पुन्हा पकडला हात, अर्धांगिनीच्या साथीने सुटाबुटात रॉयल एन्ट्री!
क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला 50 वर्षे पूर्ण झाले.
Vinod Kambli Viral Video : क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला 50 वर्षे पूर्ण झाले. मुंबई क्रिकेट संघटनेने यावेळी मुंबईसह भारतीय संघाचेही नेतृत्व केलेल्या सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, डायना एडुल्जी, सचिन, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर कर्णधारांचा विशेष सन्मान केला.
सूर्यकुमार यादवपासून ते श्रेयस अय्यरपर्यंत अनेक प्रसिद्ध खेळाडूंनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी देखील उपस्थित होता. पण, त्याच्या आजारामुळे त्याला येथे फिरण्यासही अडचण येत होती. पण या काळात त्याची पत्नी त्याचा हात धरून त्याला आधार देत होती. या क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतासाठी कसोटी आणि एकदिवसीय खेळणारा विनोद कांबळी बऱ्याच काळापासून आजारांनी ग्रस्त आहे. अलिकडेच त्याची प्रकृती खूपच बिघडली होती, त्यानंतर त्यांला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण आता तो पूर्वीपेक्षा चांगला दिसत आहे, पण त्याला नीट बोलण्यात आणि चालण्यात अडचण येत आहे.
Vinod Kambli at the Wankhede Stadium #cricket #VinodKambli #50yearsofWankhede pic.twitter.com/gTYp1mXP4d
— Aman (@Amanriz78249871) January 20, 2025
अलिकडेच, मुंबई क्रिकेट असोसिएशनने भारत आणि मुंबईसाठी खेळलेल्या मुंबईच्या क्रिकेटपटूंसाठी एक सत्कार समारंभ आयोजित केला होता. वानखेडे येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. यामध्ये विनोद कांबळी त्याची पत्नी अँड्रिया हेविटचा हात धरून वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करताना दिसत आहे. पुन्हा एकदा वाईट काळात कांबळीची पत्नी त्याची सर्वात मोठी ताकद राहिली.
View this post on Instagram
53 वर्षीय कांबळीला हृदयविकाराचा झटका, लघवीची समस्या यासारख्या गंभीर आजारांनी ग्रासले आहे. त्याने भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय असे दोन्ही फॉरमॅटमघ्ये एकूण 121 सामने खेळले आहे. त्याने एकदिवसीय सामन्यात 2 शतकांसह 2477 धावा केल्या आहेत. विनोदने कसोटी सामन्यात 4 शतकांसह 1084 धावा केल्या होत्या.
2006 मध्ये कांबळी-आंद्रियाचे झाले लग्न
कांबळीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, तो 2000 मध्ये अँड्रियाला भेटला. अँड्रिया एक मॉडेल आणि फॅशन डिझायनर आहे. दोघांनीही 6 वर्षे डेटिंग केल्यानंतर 2006 मध्ये लग्न केले. आता दोघेही दोन मुलांचे पालक आहेत. या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.