एक्स्प्लोर

Vaibhav Suryavanshi Record : वैभव सूर्यवंशीचं नाव ऐकूनच ओमानच्या टीमला घाम फुटला; एकच मोठा शॉट अन् महारिकॉर्ड रचण्याची संधी; होणार जगातील पहिला फलंदाज

Vaibhav Suryavanshi Marathi News : आशिया कप रायझिंग स्टार्स 2025मध्ये वैभव सूर्यवंशीसमोर वर्ल्ड रेकॉर्ड रचण्याची सुवर्णसंधी आहे.

IND-A vs Oman T20 Match Live Streaming Asia Cup Rising Stars 2025 : आशिया कप रायझिंग स्टार्स 2025मध्ये वैभव सूर्यवंशीसमोर वर्ल्ड रेकॉर्ड रचण्याची सुवर्णसंधी आहे. आज भारताचा सामना ओमानशी होणार असून, या सामन्यात वैभव फक्त दोन षटकार ठोकण्यात यशस्वी झाला, तर एका एडिशनमध्ये सर्वाधिक छक्क्यांचा नवा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला जाईल. 

सध्या हा रेकॉर्ड अफगाणिस्तानच्या सदीकुल्लाह अटलच्या नावावर आहे. अटलने 2024 मध्ये एका एडिशनमध्ये एकूण 19 षटकार ठोकले होते. वैभवाने आज दोन षटकार मारताच तो 20 चा आकडा गाठणारा आशिया कप रायझिंग स्टार्स इतिहासातील पहिला फलंदाज ठरेल. या वर्षी आतापर्यंत वैभवच्या बॅटमधून 18 षटकार मारले आहेत.

आशिया कप रायझिंग स्टार्सच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज 

सदीकुल्लाह अटल - 19 (2024)
वैभव सूर्यवंशी - 18 (2025)
नजीबुल्लाह झद्रान - 15 (2017)
दरवेश रसूल - 12 (2019)
हिम्मत सिंग - 9 (2018)
कामरान गुलाम - 6 (2023)
उदारा सुपेक्षा जयसुंदरा - 5 (2013)

फक्त षटकारांमध्येच नाही, तर वैभव सूर्यवंशी धावांचा पाऊस पाडत आहे. 14 वर्षांच्या या युवा पठ्ठ्याने दोन डावांत तब्बल 189 धावा केल्या असून तो सध्या 2025 मधील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. आशिया कप रायझिंग स्टार्सच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रमही सध्या सदीकुल्लाह अटलच्या नावावर आहे. अटलने 2024 च्या स्पर्धेत 5 डावांत 368 धावा केल्या होत्या. 

भारताकडून एका सीजनमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान के. एल. राहुलच्या नावावर असून, राहुलने 2013 मध्ये 5 डावांत 321 धावा ठोकल्या होत्या. वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत केवळ दोन सामने खेळून 94.50 च्या सरासरीने 189 धावा, त्यात 16 चौकार आणि 18 षटकार, अशी धडाकेबाज कामगिरी केली आहे.

आशिया कप रायझिंग स्टार्सच्या इतिहासात एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

2024 - सेदीकुल्लाह अटल (अफगाणिस्तान, 368, 5 डाव)
2017 - चरिथ असलंका (338 धावा - 5 डाव)
2013 - केएल राहुल (321 धावा, 5 डाव)
2018 - कामिंदू दिलांका मेंडिस (310 धावा - 5 डाव)
2019 - रोहेल नझीर (पाकिस्तान, 302 - 5 डाव)
2023 - अविष्का फर्नांडो (श्रीलंका, 255 - 4 डाव)
2025 - वैभव सूर्यवंशी (भारत, 189 - 2 डाव)

सामना कधी आणि कुठे होणार? (India A vs Oman Rising Stars Asia Cup Live Streaming)

भारत आणि ओमान यांच्यातील सामना 18 नोव्हेंबर रोजी कतारची राजधानी दोहा येथे असलेल्या वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. तर टॉस संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे.

थेट प्रसारण कुठे पाहता येईल? (When, where and how to watch IND vs OMN live)

सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग SonyLIV अॅपवर उपलब्ध असेल. तर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर सामन्याचा थेट दूरदर्शन प्रसारण पाहता येईल. SonyLIV च्या वेबसाइटवरसुद्धा सामना लाइव्ह पाहण्याची सुविधा असेल.

हे ही वाचा - 

IND vs SA 2nd Test : पहिल्या सामन्यात पराभव, आता भारत अन् द. अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्याची वेळ बदलली; BCCI चा निर्णय, नेमकं कारण काय?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Hardik Pandya :  हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Embed widget