एक्स्प्लोर

World Cup : भारताकडून सर्वाधिक षटकार कुणाच्या नावावर? रोहित तिसऱ्या क्रमांकावर, युवराज 5 मध्येही नाही

Top 5 Batters With Most Six in World Cup : विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक षटकार कुणी मारलेत माहितेय का? षटकार किंग म्हणून ओळखला जाणारा युवराज आघाडीच्या पाच फलंदाजामध्येही नाही.

Top 5 Batters With Most Six in World Cup : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिलेत. सध्या सराव सामने सुरु झाले आहेत. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर यादरम्यान विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. या विश्वचषकात अनेक विक्रम होतील, काही विक्रम मोडले जातील. भारतीय खेळाडूही तुफान फॉर्मात आहेत. विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक षटकार कुणी मारलेत माहितेय का? षटकार किंग म्हणून ओळखला जाणारा युवराज आघाडीच्या पाच फलंदाजामध्येही नाही... कोणत्या पाच जणांनी भारतासाठी विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकलेत पाहूयात... 

5 . महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) :

2011 विश्वचषक फायनलमध्ये धोनीचा विजयी षटकार कुणीही विसरु शकत नाही. विश्वछचषकात भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजामध्ये एमएस धोनीचाही क्रमांक लागतो. या यादीज धोनी पाचव्या स्थानावर आहे. धोनीने भारतासाठी विश्वचषकाच्या 29 सामन्यात 15 षटकार मारले आहेत. त्याशिवाय धोनीने विश्वचषकात 780 धावा केल्या आहेत. 

4. वीरेंद्र सहवाग (Virender Shewag) :

भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. सेहवाग पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी करतो, त्यामुळेच तो या यादीमध्ये आहे. सेहवागने भारतासाठी 22 सामन्यात 18 षटकार ठोकले आहेत.तर विश्वचषकात त्याने 843 धावा केल्या आहेत. 

3. रोहित शर्मा (Rohit Sharma) :

चौकार-षटकारांची आतषबाजी करणाऱ्या रोहित शर्माला क्रिकेटमध्ये हिटमॅन म्हणून ओळखले जाते. रोहित शर्माने आयसीसीच्या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. रोहित शर्माने दोन विश्वचषकात भारतासाठी 17 सामने खेळले आहेत. रोहितने विश्वचषकात 23 षटकार मारले आहेत. 2023 विश्वचषकात फक्त 5 षटकार मारताच रोहित शर्मा भरातासाठी सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्माकडून मोठ्या कामगिरीची आपेक्षा आहे. 

2. सौरव गांगुली (Sourav Ganguly) : 

विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गांगुलीने विश्वचषकात 21 सामन्यात  25 षटकार ठोकले आहेत. विश्वचषकात 55.88 च्या सरासरीने 1006 धावा चोपल्या आहेत. 


1. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) : 

गॉर्ड ऑफ क्रिकेट म्हणून ख्याती असणाऱ्या सचिन तेंडुलकर या यादीत पहिल्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकरने 1992 ते 2011 यादरम्यान विश्वचषकात 45 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने 27 षटकार ठोकले आहेत. सचिनचा हा विक्रम रोहित शर्मा यंदा मोडण्याची शक्यता आहे. रोहित शर्माला यासाठी फक्त पाच षटकारांची गरज आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Pat Cummins : बेस्ट टीम मैदानात उतरवल्यानंतरही घरच्या मैदानावर बांगलादेशकडून पराभव, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
बांगलादेशनं 23 वर्षात जे जमलं नाही ते करुन दाखवलं, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Aus vs Ban 1st Test : बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
IND vs SL 1st Test DAY-2 : पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget