The Hundred : बाबर, रिझवानवर कोणत्याच संघाने नाही लावली बोली, इंग्लंडच्या 'द हंड्रेड' लीगसाठी असे आहेत सर्व संघ
The Hundred tournament : इंग्लंडमधील 'द हंड्रेड'च्या तिसऱ्या हंगामासाठी सर्व 8 संघांची निवड करण्यात आली आहे. नवीन हंगामासाठी एकूण 112 खेळाडूंचा मसुदा तयार करण्यात आला आहे.
Babar Azam and Mohammad Rizwan : इंग्लंडच्या द हंड्रेड (The Hundred tournament) या छोट्या फॉरमॅट स्पर्धेच्या तिसऱ्या सत्रासाठी खेळाडूंचा मसुदा समोर आला आहे. या लीगच्या सर्व 8 संघांमध्ये 14-14 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. विशेष गोष्ट म्हणजे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन दिग्गज फलंदाज बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांना येथील कोणत्याही संघाने विकत घेतलेले नाही. हे दोन्ही खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत.
'द हंड्रेड'साठी केवळ चार पाकिस्तानी खेळाडूंची निवड झाली आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ यांची वेल्स फायर संघाने निवड केली आहे. त्याच वेळी, पीएसएल 2023 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या एहसानुल्लाला ओव्हल इनव्हिजिबल्सने संधी दिली आहे. पाकिस्तानचा फिरकी अष्टपैलू खेळाडू शादाब खानचा बर्मिंगहॅम फिनिक्सच्या संघात समावेश करण्यात आला आहे. शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान 1-1 कोटींच्या मसुद्यात आहेत, तर हारिस रौफचा 60 लाख आणि एहसानुल्लाह 40 लाखांच्या मसुद्यात समावेश आहे.
कसे आहेत नेमके संघ पाहूया...
The men's squads from #TheHundredDraft 🙌 pic.twitter.com/1YZXEyzdzm
— Sky Sports Cricket (@SkyCricket) March 23, 2023
मागील दोन हंगाम चांगले झाले हिट
इंग्लंडची ही स्पर्धा यावर्षी 1 ऑगस्ट 2023 पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचे शेवटचे दोन मोसम अतिशय मनोरंजक ठरले. क्रिकेटच्या या नव्या फॉरमॅटचे लोकांनी कौतुक केले आहे. अशा परिस्थितीत जगभरातील अनेक क्रिकेटपटूंनी या स्पर्धेच्या तिसऱ्या सत्रात खेळण्यासाठी नोंदणी केली होती, मात्र निवडक खेळाडूंनाच येथे स्थान मिळू शकले.
आठ संघामध्ये रंगणार स्पर्धा
'द हंड्रेड'मध्ये आठ संघ आहेत आणि प्रत्येक संघात 14-14 खेळाडू आहेत. म्हणजेच पुढील हंगामासाठी एकूण 112 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यातील बहुतांश खेळाडू केवळ इंग्लंडचे आहेत. यानंतर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेतील खेळाडूंची संख्या चांगली आहे. ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड हे खेळाडूही तिसऱ्या सत्रात वेगवेगळ्या संघांसोबत खेळताना दिसणार आहेत.
आयपीएलसाठी क्रिकेटविश्व सज्ज
आयपीएलचा आगामी हंगाम सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रत्येक संघांनी आपापली तयारी सुरु केली आहे. चाहत्यांमध्ये उत्साह दिसतोय. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक आयपीएल हंगामावेळी बदल केले जातात. IPL च्या 16 व्या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये दहा संघाचा सहभाग असेल, या संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे
हे देखील वाचा-