(Source: Poll of Polls)
Virat Kohli New Hairstyle : आयपीएल 2023 पूर्वी किंग कोहलीचा न्यू लूक, फोटो झाला VIRAL
Virat Kohli : आयपीएलपूर्वीच स्टार क्रिकेटर विराट कोहली नव्या हेअरस्टाइलमध्ये दिसून आला आहे. विराट कोहलीने त्याच्या नव्या लूकचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Virat Kohli New Look Photo Viral : आयपीएल 2023 (IPL) स्पर्धा सुरु होण्यसाठी काही दिवसचं शिल्लक आहेत. 31 मार्चपासून सामन्यांना सुरूवात होणार आहे. यासाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. त्याचवेळी, क्रिकेटच्या या ग्रँड लीगपूर्वी टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) एका नव्या लूकमध्ये दिसला आहे. कोहलीने आयपीएलपूर्वी आपले केस कापले आहेत. दरम्यान त्याच्या या नवीन हेअरस्टाईलचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
आयपीएलमध्ये विराट नव्या हेअरस्टाईलमध्ये दिसणार कोहली
इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी सीझनमध्ये विराट कोहली नव्या हेअरस्टाईलमध्ये दिसणार आहे. आरसीबी कॅम्पमध्ये सामील होण्यापूर्वी आणि आयपीएल सुरु होण्यापूर्वी त्याने आपले केस कापले आहेत. नव्या लूकचा फोटो स्वतः विराटने सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराटच्या नव्या हेअरस्टाइलचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विराटसोबत हेअरस्टायलिस्ट अलीमही त्याच्या फोटोत दिसत आहे. तर या फोटोमध्ये विराट अलीमला जादूगार म्हणत आहे.विराट कोहलीला हा नवा लूक देणारा अलीम हकीम हा प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट आहे. अलीमने अनेक सेलिब्रिटींना नवा लूक दिला आहे. अलीम हे बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक बड्या व्यक्तींशी संबंधित आहेत. या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज विराट कोहलीचाही समावेश आहे.
IPL 2023 साठी RCB संघ
विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, रजत पाटीदार, अनुज रावत, आकाश दीप, जोश हेजलवूड, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, शर्मा, सिद्धार्थ कौल, डेव्हिड विली, रीस टोपले, हिमांशू शर्मा, मनोज भांडगे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव, मायकल ब्रेसवेल
अखेर कसोटी शतकांचा दुष्काळ संपला
विशेष म्हणजे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीत जवळपास 3 वर्षानंतर म्हणजे 1205 दिवसानंतर कोहलीने कसोटी शतक ठोकलं आहे. याआधी अखेरचं कसोटी शतक कोहलीने बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबर 2019 मध्ये ठोकलं होतं. त्यानंतर थेट आता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च 2023 मध्ये शतक ठोकलं आहे. आजच्या डावात विराटने केवळ 5 चौकार ठोकत हे शतक केलं आहे. एकही षटकार त्याने ठोकलेला नाही. दरम्यान 2019 साली कसोटी फॉरमॅटमध्ये शेवटचे शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीची फलंदाजीची सरासरीही गेल्या 20 कसोटी डावांमध्ये खूपच खराब होती. ज्यामध्ये त्याने केवळ 25 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटने फक्त एकदाच 50 हून अधिक धावांची खेळी पाहिली होती, जी डिसेंबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान केली होती. पण आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक ठोकल्यावर विराट पुन्हा फॉर्मात परतेल अशी आशा फॅन्सना आहे.
हे देखील वाचा-