Ind vs SA: केएल राहुलकडे सचिन आणि विराटचा 'हा' विक्रम मोडण्याची संधी
KL Rahul: केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक नवा विक्रम करणार आहे. जर त्यानं आज 48 धावा केल्या तर तो सचिन तेंडुलकर आणि विराटचाही विक्रम मोडेल.
KL Rahul needs 48 runs to break record: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान (Ind vs SA) सुरु असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना (Test Series) सेंचुरियन (Centurion) मध्ये सुरु आहे. टीम इंडिया (Team India) नं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या दिवस सलामीवीर केएल राहुल (KL Rahul)च्या नावे राहिला. राहुल 122 धावा बनवून अजूनही मैदानात आहे. आज राहुलकडे सचिन आणि विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. राहुलच्या 122 धावांच्या बळावर टीम इंडियानं पहिल्या दिवशी 3 विकेट्सवर 272 धावा केल्या. राहुलनं कसोटीतलं आपलं सातवं शतक साजरं केलं.
या खेळीत राहुलनं अनेक विक्रम केले. तो आफ्रिकेत शतक झळकावणारा दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. त्याआधी भारताच्या वसीम जाफरनं ही कामगिरी केली होती. राहुल सेंचुरियनच्या मैदानावर शतक झळकावणारा जगातील तिसरा विदेशी खेळाडू देखील ठरला आहे. राहुलच्या आधी ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर आणि वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलनं या मैदानावर शतक केलं आहे.
राहुलनं सात शतकं इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि साउथ आफ्रिका या संघांविरुद्ध झळकावलीत. या सहा देशात शतक ठोकणारा राहुल तिसरा ओपनर आहे. त्याआधी सुनील गावसकर आणि वीरेंद्र सहवाग यांनी अशी कामगिरी केली होती.
सचिन आणि कोहलीचं रेकॉर्ड
सेंचुरियन टेस्टच्या पहिल्या राहुल 122 धावा करत नाबाद आहे. या सामन्यात राहुलकडे अजून एका विक्रमाची संधी आहे. जर त्यानं 48 धावा आणखी जोडल्या तर तो दक्षिण आफ्रिकेत सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय खेळाडू ठरेल. आधी हा विक्रम सचिनच्या नावे आहे. सचिननं 1997 मध्ये एका मालिकेत 169 धावा केल्या होत्या. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी देखील 150 धावांची खेळी केली आहे.
काल पहिल्या दिवसाचा खेळ संपताना के. एल. राहुल ( KL Rahul) 122 आणि अजिंक्य राहणे (Ajinkya Rahane ) 40 धावांवर नाबाद आहेत. दक्षिण आफिकेच्या लुंगी एनिग्डीने सर्वच्या सर्व म्हणजे तिन्ही विकेट आपल्या नावे केल्या.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha