(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Suresh Raina Retirement: 'थँक्यू मिस्टर आयपीएल!' सुरेश रैनासाठी चेन्नई सुपरकिंग्जची खास पोस्ट
Suresh Raina Retirement: भारताचा स्टार फलंदाज सुरेश रैनानं (Suresh Raina) 15 ऑगस्ट 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं.
Suresh Raina Retirement: भारताचा स्टार फलंदाज सुरेश रैनानं (Suresh Raina) 15 ऑगस्ट 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला (International Cricket) अलविदा केलं. त्यावेळी त्यानं आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, आज त्यानं आयपीएल (IPL) आणि देशांतर्गत क्रिकेटमधून (Domestic Cricket) निवृत्ती घेवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. सुरेश रैनाच्या या निर्णयानंतर क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या सर्वोत्तम खेळीपासून त्याच्या जबरदस्त शॉट्सपर्यंतचे व्हिडिओ शेअर करत आहेत. याच पार्श्वभूमीवर चेन्नई सुपरकिंग्जनं (Chennai Super Kings) सोशल मीडियावर सुरेश रैनासाठी खास पोस्ट केलीय.
चेन्नई सुपर किंग्सनं ट्वीटवर केलेल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, 'चेन्नईचे रस्ते चिन्ना थालानं संघासाठी दिलेलं योगदान कधीच विसरणार नाहीत. धन्यवाद मिस्टर आयपीएल!' आयपीएलमध्ये सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्जकडून दीर्घकाळ क्रिकेट खेळला आहे. तो आयपीएलमध्ये चेन्नईसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. एकेकाळी तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही होता. ज्यामुळं त्याला मिस्टर आयपीएल म्हणून ओळखलं जातंय.
चेन्नई सुपरकिंग्जचं ट्वीट-
सुरेश रैनाच्या चाहत्यांना मोठा धक्का
आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी चेन्नईच्या संघानं त्याला संघात कायम ठेवलं नाही. त्यानंतर झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये कोणत्याही संघानं त्याच्यावर बोली लावली नाही आणि तो अनसोल्ड ठरला. ज्यामुळं त्याला आयपीएल 2022 मध्ये खेळता आलं नाही. आयपीएलच्या पुढच्या हंगामात सुरेश रैना पिवळ्या नाहीतर इतर कोणत्याही रंगाच्या जर्सीत मैदानात दिसेल, असं त्याच्या चाहत्यांना वाटत होतं. परंतु, आयपीएलचा पुढचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सुरेश रैनानं निवृत्तीचा निर्णय घेऊन चाहत्यांना मोठा धक्का दिलाय.
सुरेश रैनाची आयपीएल कारकिर्द
आयपीएल विश्वातील यशस्वी खेळाडूंमध्ये रैनाचं नाव आघाडीवर आहे. त्यानं 205 सामन्यांमध्ये 32.52 ची सरासरी आणि 136.76 च्या स्ट्राईक रेटनं 5 हजार 528 धावा केल्या आहेत. ज्यात एक शकत आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये रैना पाचव्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा-