एक्स्प्लोर

यांच्या हातात बॅट नाही जणू तलवारच असते, गोलंदाजांवर तुटून पडतात; टीम इंडियाचे धडाकेबाज फलंदाज!

IND vs AUS: आता विश्वचषक मोहिमेच्या सांगतेला टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या फौजा अहमदाबादच्या रणांगणात आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत.

IND vs AUS World Cup 2023 Final: विश्वचषकाच्या (World Cup 2023) महायुद्धातल्या निर्णायक लढाईसाठी आज अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) सज्ज झालंय. इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघांमधल्या सलामीच्या लढाईनं विश्वचषकाच्या मोहिमेला पाच ऑक्टोबर रोजी याच स्टेडियममधून सुरुवात झाली होती. आणि आता विश्वचषक मोहिमेच्या सांगतेला टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या फौजा अहमदाबादच्या रणांगणात आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत. वन डे क्रिकेटच्या इतिहासात भारतानं आजवर 1983 आणि 2011 साली विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. तसंच ऑस्ट्रेलियानं 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 साली विश्वचषकाचा मान मिळवला आहे.

यांच्या हातात बॅट नाही जणू तलवारच असते, गोलंदाजांवर तुटून पडतात; टीम इंडियाचे धडाकेबाज फलंदाज!

रोहित शर्मा (Rohit Sharma)

विश्वचषक 2023 मध्ये रोहित शर्मानं एकही गोलंदाजाला अभय दिलं नाही. जो मला बॉल टाकणार त्याला मी झोडणार, अशाच आवेशात रोहित शर्मा मैदानात उतरतो आणि भल्याभल्या गोलंदाजांना फटकावतो. रोहित शर्मानं 10 डावांत 550 धावांची धमाकेदार खेळी 101.57 च्या सरासरीनं खेळली आहे. 

यांच्या हातात बॅट नाही जणू तलवारच असते, गोलंदाजांवर तुटून पडतात; टीम इंडियाचे धडाकेबाज फलंदाज!

विराट कोहली (Virat Kohali)

टीम इंडियाचं रनमशिन म्हणजे, विराट कोहली. विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आता विराट कोहलीच्या नावावर झाला आहे. 20 वर्षांपासून हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीनं आठव्यांदा 50 धावसंख्या ओलांडत सचिन तेंडुलकरचा 2003 विश्वचषकातील रेकॉर्ड मोडलाय. सचिन तेंडुलकरनं 2003 च्या विश्वचषकात 674 धावा केल्या होत्या. 20 वर्षांनंतरही हा विक्रम विराट कोहलीनं मोडला आहे. विराट कोहलीनं 101.57 च्या सरासरीनं 10 डावांत 711 धावांची खेळी खेळली आहे. 

यांच्या हातात बॅट नाही जणू तलवारच असते, गोलंदाजांवर तुटून पडतात; टीम इंडियाचे धडाकेबाज फलंदाज!

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)

श्रेयस अय्यरने विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध शानदार शतक झळकावले. त्याने चालू विश्वचषकात 2 शतकांच्या मदतीने 500 हून अधिक धावा केल्या आहेत. मात्र स्पर्धेच्या सुरुवातीला खराब कामगिरी केल्यानंतर त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. यावरही आता अय्यरनं सडेतोड उत्तर दिले आहे. श्रेयसनं विश्वचषक 2023 मध्ये 10 डावांत 75.14 च्या सरासरीनं 526 धावा केल्या आहेत. 

यांच्या हातात बॅट नाही जणू तलवारच असते, गोलंदाजांवर तुटून पडतात; टीम इंडियाचे धडाकेबाज फलंदाज!

केएल राहुल (KL Rahul)

विश्वचषकाच्या रणांगणात केएल राहुलच्या बॅटमधून निघणारे फटके, विकेटमागे झेपावत घेणारा झेल... असो अथवा डीएआरएससाठी रोहितला करत असलेली मदत...  राहुल एक नंबरी कामगिरी करतोय. दुखापतीनंतर परतलेल्या राहुलने विकेटच्या मागे 100 टक्के योगदान दिलंय. केएल राहुलनं 77.20 च्या सरासरीनं 9 डावांत 386 धावा केल्या आहेत. 

यांच्या हातात बॅट नाही जणू तलवारच असते, गोलंदाजांवर तुटून पडतात; टीम इंडियाचे धडाकेबाज फलंदाज!

शुभमन गिल (Shubman Gill)

शुभमन गिल सध्या टीम इंडियाच्या सलामीचा कणा बनला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे शुभमन गिलने ICC रँकिंगमध्ये मोठी झेप घेत अव्वल स्थान पटकावलं आहे. पण हाच शुभमन गिली प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या तोंडचं पाणीही पळवतो. शुभमन गिलनं विश्वचषक 2023 मध्ये 49.42 च्या सरासरीनं 08 डावांत 346 धावा केल्या आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IND vs AUS Final: कोणी रचला धावांचा डोंगर, कोणाचा स्ट्राईक रेट भारी; टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या टॉप-7 फलंदाजांची कामगिरी सुपर डुपर हिट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget