Pink Ball Test: पिंक बॉल कसोटीत टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंच्या सर्वाधिक धावा
Pink Ball Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना 12-16 मार्चदरम्यान खेळला जाणार आहे.
Pink Ball Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना 12-16 मार्चदरम्यान खेळला जाणार आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. हा सामना पिंक बॉलनं खेळला जाणार आहे. डे-नाईट कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी चांगली कामगिरी करून दाखवलीय. श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित आणि विराट मोठी खेळी करतील, अशी अपेक्षा केली जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत पहिल्यांदाच पिंक बॉल कसोटी सामना खेळणार आहे.
भारतानं आतापर्यंत पिंक बॉलनं एकूण तीन कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. भारतानं 2019 मध्ये पहिला पिंक बॉल कसोटी सामना बांग्लादेशविरुद्ध खेळला होता. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्डेडिअमवर खेळला गेला होता. ज्यात 46 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या पिंक बॉल कसोटी सामन्यात भारताला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. भारतानं अखेरचा पिंक बॉल कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता. या सामन्यात भारतानं 10 विकेट्स राखून इंग्लंडचा धुव्वा उडवला होता.
पिंक बॉल कसोटीत विराटचं शतक
पिंक बॉल कसोटी भारताकडून शतक झळकावणारा विराट कोहली पहिला भारतीय फलंदाज आहे. तसेच पिंक बॉल कसोटी सामन्यात भारतासाठी त्यानं सर्वाधिक धावा केल्या आहे. त्यानं तीन सामन्याच्या चार डावात 60.25 च्या सरासरीनं 241 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
पिंक बॉल कसोटीत रोहितची कामगिरी
पिंक बॉल कसोटी सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं तीन डावात 112 धावा केल्या आहेत. ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट आणि रोहित दोघेही भारतीय संघाचा भाग आहेत.श्रीलंकाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय.
हे देखील वाचा-
- Maharashtra Kesari : 'महाराष्ट्र केसरी' यंदा साताऱ्यात; 4 ते 9 एप्रिलदरम्यान रंगणार मानाच्या गदेसाठी चुरस
- Cheteshwar Pujara: टीम इंडियात स्थान न मिळाल्यानं चेतेश्वर पुजारानं उचललं मोठं पाऊल
- German Open : जर्मन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायनासह पीव्ही सिंधू पराभूत, श्रीकांत मात्र विजयी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha