Cheteshwar Pujara: टीम इंडियात स्थान न मिळाल्यानं चेतेश्वर पुजारानं उचललं मोठं पाऊल
Cheteshwar Pujara: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पुजारानं खराब कामगिरी केली होती. ज्यामुळं श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याला वगळण्यात आलं होतं.
Cheteshwar Pujara: टीम इंडियात स्थान न मिळाल्यानं चेतेश्वर पुजारानं काउंटी चॅम्पियनशिप आणि रॉयल लंडन वन-डे स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतलाय. पुजारा आता ससेक्स संघाकडून खेळणार आहे. ट्रॅव्हिड हेडच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळं त्यानं संघ सोडल्याची माहिती समोर येत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पुजारानं खराब कामगिरी केली होती. ज्यामुळं श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याला वगळण्यात आलं होतं.
लवकरच पुजारा ससेक्स संघात सामील होणार असल्याचं क्लबनं निवेदनात म्हटलंय. श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठी पुजाराचा टीम इंडियात समावेश करण्यात आला नव्हता. यासोबतच बीसीसीआयने त्याच्या कराराचा दर्जाही कमी केला आहे. पुजारा A+ वरून B श्रेणीत आलाय.
महत्वाचे म्हणजे, चेतेश्वर पुजारानं चार वेळा काऊंटी क्रिकेटमध्ये सहभाग घेतलाय. याआधी त्यानं डब्रीशायर (2018), यार्कशायर (2015, 2018) आणि 2017 मध्ये नॉटिंगहॅमशायरकडून काऊंटी क्रिकेट खेळला आहे. "मला याबद्दल खूप आनंद आणि सन्मान वाटतो. मी लवकरच ससेक्स फॅमिलीमध्ये सामील होणार आहे. मी यूकेमध्ये काउंटी क्रिकेटचा खूप आनंद लुटला आहे, ससेक्समध्ये सामील झाल्यानंतर पुजारानं म्हटलंय.
दरम्यान, जुलै महिन्यात भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यावर जायचं आहे. या दौऱ्यावर भारताल टी-20 मालिका आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. तसेच दोन्ही संघात एकमेव कसोटी सामनाही रंगणार आहे. या कसोटी सामन्यात पुजाराला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. काऊंटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यास त्याची भारतीय संघात निवड होऊ शकता.
टीम इंडियाला जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. येथे दोन्ही संघांमध्ये टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. यासोबतच एक कसोटी सामनाही खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी पुजाराला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळू शकते. काउंट क्रिकेटमध्ये तो चांगला खेळला तर त्याला संधी मिळू शकते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खराब कामगिरीमुळं त्याच्यावर टीका करण्यात आली होती.
- ICC Women's World Cup 2022 : विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यांत किवीजकडून भारताचा पराभव, कर्णधार मितालीनं सांगितलं कारण
- ICC Player of the Month: विराट कोहली, रोहित शर्मा नव्हंतर ‘या’ भारतीय खेळाडूंना मिळालं आयसीसीच्या पुरस्कारांसाठी नामांकन
- ICC Women's World Cup 2022 : हरमनप्रीतची एकाकी झुंज, भारताचा 62 धावांनी पराभव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha