Team India : टीम इंडियाचा वानखेडेवर सत्कार सोहळा, राष्ट्रगीत सुरु असताना पाऊस सुरु, विराट अन् रोहित आश्चर्यचकीत Video
T20 World Cup 2024: टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकणाऱ्या टीम इंडियाचं वानखेडे स्टेडियमवर जोरदार स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
मुंबई : रोहित शर्माच्या (Rohit Sharma ) नेतृत्त्वातील टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत काल करण्यात आलं. टीम इंडिया (Team India) काल सकाळी भारतात नवी दिल्लीत दाखल झाल्यापासून ते मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पोहोचेपर्यंत जल्लोष सुरु होता. भारतीय क्रिकेट संघानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर संपर्ण संघ मुंबईत दाखल झाला. मुंबईत टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी विजयाच्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी लाखो मुंबईकर पोहोचले होते.वानखेडेवर भारतीय संघाचा सत्कार सोहळा संपल्यानंतर राष्ट्रगीत सुरु होतं. यावेळी वरुणराजानं देखील हजेरी लावली.
राष्ट्रगीत सुरु असताना पावसाला सुरुवात
नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यान मरीन ड्राईव्हवर मोठ्या संख्येनं टीम इंडियाचे चाहते जमले होते. या चाहत्यांमधून मार्ग काढत रोहित शर्मा आणि संपूर्ण संघाची बस वानखेडेवर पोहोचली. इथल्या सत्कार सोहळ्यानंतर राष्ट्रगीत सुरु होतं. राष्ट्रगीत संपण्याच्यावेळी हलक्या पावसाला सुरुवात झाली.
राष्ट्रगीत संपत असताना सुरु झालेल्या पावसानं रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह इतर खेळाडू आश्चर्यचकीत झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते देखील या व्हिडिओला पसंत करत आहेत.
As soon as the National Anthem came to an end, even the heavens congratulated the team with a light shower ❤️🥳#T20WCChampions
— Sameer (@BesuraTaansane) July 4, 2024
video credits @JioCinema pic.twitter.com/2HiexU2Ouz
भारतीय क्रिकेट संघानं 29 जूनला वेस्ट इंडिजमध्ये बारबाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 ला धावांनी पराभूत केलं होतं.बारबाडोसमध्ये चक्रीवादळ आल्यानं भारतीय संघ अडकून पडला होता. अखेर काल भारतीय संघ नवी दिल्लीत दाखल झाला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर मुंबईत विजयी परेड काढण्यात आली होती. यामध्ये लाखोंच्या संख्येनं मुंबईकर जमले होते.
वानखेडे स्टेडियमवर हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत टीम इंडियाच्या खेळाडूंना बीसीसीआयनं 125 कोटी रुपयांच्या बक्षीसाच्या चेकनं सन्मानित केलं. भारताच्या खेळाडूंनी मैदानाला फेरी मारत चाहत्यांना अभिवादन केलं. खेळाडूंना डान्स देखील केला. मुंबईत टीम इंडियाच्या स्वागताला लाखो चाहत्यांचा जनसागर पोहोचला होता. या सर्वांना टीम इंडियाच्या विजेत्या खेळाडूंनी अभिवादन केलं.
संबंधित बातम्या :