Ind vs Sa 1st T20 : संजू सॅमसनचा पुन्हा पत्ता कट, 'हे' तीन स्टार खेळाडूही बाहेर, टीम इंडियाचा मोठा निर्णय, जाणून कोण IN, कोण OUT
India vs South Africa 1st T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये खेळला जात आहे.

India vs South Africa 1st T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी मात्र प्लेइंग-11 निवडताना मोठा निर्णय घेतला आहे. स्टार विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला पुन्हा एकदा संघाबाहेर बसावे लागले आहे. त्याचबरोबर आणखी तीन खेळाडूंनाही बेंचवर ठेवण्यात आले आहे.
संजू सॅमसनला पुन्हा नाही संधी
टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये विकेटकीपर म्हणून जितेश शर्मा याची निवड करण्यात आली असून त्यामुळे संजू सॅमसनला जागा मिळू शकली नाही. ऑस्ट्रेलिया दौर्यावरही त्याला बेंचवरच बसावे लागले होते आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. संजू सॅमसनसोबत कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही अंतिम संघात स्थान मिळालं नाही.
🚨 Toss 🚨#TeamIndia have been put into bat first.
— BCCI (@BCCI) December 9, 2025
Updates ▶️ https://t.co/tiemfwcNPh #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZCl53IqrWK
गिल-पांड्याचे पुनरागमन
अभिषेक शर्मासोबत शुभमन गिल सलामीची धुरा सांभाळणार आहेत. दुखापतीनंतर गिलची टीममध्ये पुनरागमन झाले आहे. तिलक वर्मालाही संघात स्थान मिळाले आहे. सूर्यकुमार यादव आपला आक्रमक फॉर्म कायम ठेवत संघाचे नेतृत्व करत आहेत. विकेटकीपिंगची जबाबदारी जितेश शर्मा सांभाळणार आहे. हार्दिक पंड्यानेही दुखापतीतून सावरत टीममध्ये पुनरागमन केले आहे. शिवम दुबेही संघाचा भाग आहेत. स्पिन विभागात अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांची जोडी उतरली असून वेगवान गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहकडे आहे.
दक्षिण आफ्रिका संघाची प्लेइंग-11
क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुथो सिपामला, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे
भारतीय संघाची प्लेइंग-11
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.
हे ही वाचा -
Presenting #TeamIndia's Playing XI for the 1⃣st T20I 🙌
— BCCI (@BCCI) December 9, 2025
Updates ▶️ https://t.co/tiemfwcNPh #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Dtr31OTdE3





















