T20 World Cup 2026 : जिओस्टारने हात झटकताच टी20 वर्ल्ड कप प्रसारण धोक्यात; भारतात दिसणार नाहीत सामने? चाहत्यांमध्ये खळबळ
ICC Jio Rights T20 World Cup 2026 : 2026 टी20 विश्वचषकाला आता जास्त वेळ उरलेला नाही. भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत.

Why Jio Hotstar Is Pulling OUT of ICC Deal : 2026 टी20 विश्वचषकाला आता जास्त वेळ उरलेला नाही. भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. 7 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान होणाऱ्या या मेगा टूर्नामेंटमध्ये 20 संघ सहभागी होतील आणि जगभरात क्रिकेट चाहते भारतात पोहोचणार आहेत. पण या पार्श्वभूमीवर आयसीसीला मोठा धक्का बसला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिओस्टारने 2026 टी20 विश्वचषकाचे प्रसारण करण्यास नकार दिला आहे.
या निर्णयामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण झाला आहे की जिओस्टारने अचानक असा निर्णय का घेतला? आणि भारतातील प्रेक्षकांना टी20 विश्वचषकाचे सामने टीव्ही आणि मोबाईलवर लाईव्ह पाहता येणार नाहीत का? चला, जाणून घेऊया नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण...
जिओस्टारने प्रसारण का नाकारले?
द इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, जिओस्टारने आयसीसीला कळवले आहे की तो 2027 पर्यंतचा मीडिया करार पुढे चालू ठेवू शकणार नाहीत. यामागील कारण म्हणजे झालेला प्रचंड आर्थिक तोटा. महत्वाची बाब म्हणजे आयसीसीने 2026 ते 2029 या कालावधीसाठी मीडिया राइट्स विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. आयसीसीला या राइट्समधून अंदाजे 2.4 अब्ज डॉलर्स मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, जिओस्टारच्या अचानक घेतलेल्या या निर्णयाने आयसीसीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. 2023 ते 2027 साठी जिओस्टारने आयसीसीसोबत तब्बल 3 अब्ज डॉलर्सची डील केली होती.
🚨 JIOSTAR WANTS AN EXIT FROM ICC MEDIA RIGHTS DEAL. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 8, 2025
- Jio has informed ICC that they don’t want to continue as the streaming partner after facing 25,760cr financial loss in 2024-25. (Economic Times). pic.twitter.com/gjbWtaRJVf
भारतामध्ये टी20 विश्वचषकाचे लाईव्ह प्रसारण होणार नाही का?
रिपोर्ट्सनुसार, जिओस्टारने पाऊल मागे घेतल्यानंतर आयसीसीने नव्या ब्रॉडकास्टिंग पार्टनरच्या शोधाला सुरुवात केली आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया, नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ यांच्यासह अनेक प्लॅटफॉर्मना बोलीसाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, डीलची रक्कम अतिशय मोठी असल्याने या कोणत्याही प्लॅटफॉर्मने अद्याप रस दाखवलेला नाही. या पार्श्वभूमीवर टी20 विश्वचषक 2026 चे आयोजन आणि प्रसारण दोन्ही धोक्यात आले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता भारतात विश्वचषकाचे लाईव्ह प्रसारण होणार नाही, अशी शक्यताही नाकारता येत नाही.
हे ही वाचा -




















