एक्स्प्लोर

मोठी बातमी: मुंबई पुन्हा एकदा थांबणार?; विश्वविजेत्या टीम इंडियाची ओपन डेकमधून विजयी मिरवणुकीची शक्यता

Indian Cricket Team In Mumbai: उद्या सकाळी 6 वाजता टीम इंडिया दिल्लीत दाखल होणार आहे. 

Indian Cricket Team In Mumbai: टीम इंडियाने (Indian Criclet Team) 29 जून 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन टी-20 विश्वचषकावर (T20 World Cup 2024) आपले नाव कोरले. 2013 नंतर टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी जिंकली.  या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देश आपल्या टीमचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. मात्र टीम इंडिया अजूनही बार्बाडोसमध्ये अडकून पडली आहे.

29 जून रोजी अंतिम सामना खेळला गेला, त्यानंतर तेथे आलेल्या चक्रीवादळाने टीम इंडियाला बार्बाडोसमध्येच राहावे लागले. वादळामुळे बार्बाडोसचे विमानतळ बंद करण्यात आले असून तेथे कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. टीम इंडिया गेल्या मंगळवारी तिथून रवाना होणार होती, पण त्याला देखील उशीर झाला. त्यामुळे उद्या सकाळी 6 वाजता टीम इंडिया दिल्लीत दाखल होणार आहे. यासाठी एक एअर इंडियाचं विशेष विमान बार्बाडोस विमानतळावर दाखल झाले आहे.

मुंबईत विजयी मिरवणूक?

टीम इंडिया मायदेशात दाखल झाल्यानंतर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदींच्या हस्ते सर्व खेळाडूंना गौरवण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे. तसेच नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल होईल. यानंतर मुंबईत विश्वचषकाच्या ट्रॉफीसह सर्व खेळाडू ओपनडेकबसमधून विजयी मिरवणूक काढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत बीसीसीआयकडून अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही. 

2007 साली काढली होती मिरवणूक-

नवख्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली नव्या दमाच्या टीम इंडियाने पाकिस्तानला लोळवून 2007 मध्ये पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जगज्जेत्या टीम इंडियाच्या खेळाडूंची मुंबईमध्ये ओपन बसमधून जंगी मिरवणूक निघाली होती. तब्बल आठ तास चाललेल्या विश्वविजयी मिरवणूक संघाचे स्वागत करण्यासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरले होते. जगज्जेत्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली जात असून बीसीसीआयने याबाबत प्रचंड गोपनीयता बाळगली असावी, अशीही शक्यता क्रिकेट जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

बीसीसीआयकडून टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस-

बीसीसीआयने भारतीय संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाला बीसीसीआय 125 कोटी रुपये देणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत ही घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह ट्विटरद्वारे म्हणाले की, मला कळवताना अतिशय आनंद होत आहे की, भारतीय संघाला आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी 125 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. 

संबंधित बातम्या:

हार्दिक पांड्याच्या मागची विघ्नं संपता संपेना; पुन्हा संशायाची पाल चुकचुकली, नेमंक काय घडलं?

रोहित-विराटपासून डेव्हिड वॉर्नरपर्यंत; 2024 च्या टी20 विश्वचषकानंतर कोणी-कोणी निवृत्ती घेतली?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जुलै 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जुलै 2024 | शनिवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supirya Sule Meet Sunetra Pawar : निकालानंतर नणंद-भावजय समोरासमोर, एकमेकींना दूरुनच हाय-हॅलोManoj Jarange On Chhagan Bhujabal : भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अत्याचार करु नका : जरांगेRohit Pawar Palkhi | गायब झालेला पाऊस पुन्हा यावा, पूर्वीचे चांगले दिवस राज्यात यावे- रोहित पवारTuljabhavani Choclate Har: तुळजाभवानीला चॉकलेटचा हार, संस्थानच्या परवानगीशिवाय हार घातल्यानं आक्षेप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जुलै 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जुलै 2024 | शनिवार
बारामतीत पवार कुटुंब एकत्र; राजकारणाच्या पंढरीत वारकऱ्यांचं अनोखं स्वागत, राजकीय बॅनर व्हायरल
बारामतीत पवार कुटुंब एकत्र; राजकारणाच्या पंढरीत वारकऱ्यांचं अनोखं स्वागत, राजकीय बॅनर व्हायरल
Maharashtra Police Recruitment : पोलीस भरती दरम्यान आणखी एका युवकाचा दुर्दैवी अंत; आतापर्यंत राज्यातली तिसरी मृत्यूची घटना
पोलीस भरती दरम्यान आणखी एका युवकाचा दुर्दैवी अंत; आतापर्यंत राज्यातली तिसरी मृत्यूची घटना
Manoj Jarange Patil : महाराष्ट्र छगन भुजबळची मक्तेदारी नाही, सरकारला इशारा, मराठ्यांच्या नादी लागलं की कार्यक्रम; मनोज जरांगेंच्या भाषणातील 10 मुद्दे
महाराष्ट्र छगन भुजबळची मक्तेदारी नाही, सरकारला इशारा, मराठ्यांच्या नादी लागलं की कार्यक्रम; मनोज जरांगेंच्या भाषणातील 10 मुद्दे
NEET पेपरफुटी प्रकरण, ZP शिक्षकाच्या बँक खात्यात मोठी उलाढाल;  आरोपीला आणखी 2 दिवसांची सीबीआय कोठडी
NEET पेपरफुटी प्रकरण, ZP शिक्षकाच्या बँक खात्यात मोठी उलाढाल; आरोपीला आणखी 2 दिवसांची सीबीआय कोठडी
Embed widget