Matthew Wa Mgde: टी-20 विश्वचषकात मैदान गाजवणारा मॅथ्यू वेड क्रिकेटला करणार अलविदा; 'या' स्पर्धेनंतर घेणार संन्यास
Matthew Wade: टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या मॅथ्यू वेडला आगामी अॅशेस मालिकेतून वगळण्यात आलंय. त्याच्या ऐवजी एलेक्स कॅरीला संघात संधी देण्यात आलीय.
Matthew Wade Plans to Retire: टी-20 विश्वचषक 2021 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून ऑस्ट्रेलियानं इतिहास रचला. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं चागंली कामगिरी केली आणि विश्वचषकाचा किताबही जिंकला. तसेच 2022 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाचं यजमानपदं ऑस्ट्रेलियाला मिळालं आहे. यातच ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज मॅथ्यू वेड लवकरच क्रिकेटला अलविदा करणार असल्याची माहिती समोर आलीय. मॅथ्यू वेडनं एका क्रिकेट वेबसाईला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या निवृत्तीवर भाष्य केलंय.
"मी सध्या ऑस्ट्रेलियात पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करीत आहे. त्यानंतर क्रिकेटमधून निवृत्त व्हावं, याबाबत माझा विचार सुरू आहे", असं मॅथ्यू वेडनं ऑस्ट्रेलियाच्या एका क्रिकेट वेबसाईट दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. महत्वाचं म्हणजे, टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या मॅथ्यू वेडला आगामी अॅशेस मालिकेतून वगळण्यात आलंय. त्याच्या ऐवजी एलेक्स कॅरीला संघात संधी देण्यात आलीय.
तंदुरुस्त नसतानाही मॅथ्यू वेडनं टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला-
मॅथ्यू वेडं टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचं त्यानं स्वत: सांगितलंय. त्यानं पुढं म्हटलंय की, तो ग्रेड टू साइड स्ट्रेनशी झुंज देत होता. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एक दिवस आधी तो खूप चिंतेत होता. पण, तरीही तो अंतिम सामना खेळला आणि ऑस्ट्रेलियानं जेतेपदावर आपली मोहर उमटवली.
पाकिस्तानविरोधात आक्रमक फलंदाजी-
टी-20 विश्वचषक 2021 च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडनं तडाखेबाज फलंदाजी केली. मॅथ्यू वेडनं उपांत्य फेरीत पाकिस्तान विरुद्ध 17 चेंडूत 41 धावांची आक्रमक खेळी केली. ज्यामुळं ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानवर 5 गडी राखून विजय मिळवला. ज्यामुळं ऑस्ट्रेलियाच्या संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवता आलं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-