Ind vs NZ : दीपक चहरची खुन्नस अन् व्यंकटेश प्रसादची आठवण; प्रसादने पाकिस्तानच्या सोहेलला त्याची जागा दाखवली
भारत-पाकिस्तान दरम्यान 1996 साली झालेल्या एका सामन्यात व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) आणि अमिर सोहेल यांच्यात क्रिकेट फाईट मोमेन्ट पाहायला मिळालं होतं. त्याचाच हा किस्सा आहे.
मुंबई : बुधवारी झालेला भारत-न्यूझीलंडच्या सामन्यातील दीपक चहर (Deepak Chahar) आणि मार्टिन गपटिल यांच्यामध्ये एक क्रिकेट फाईट मोमेन्ट पाहायला मिळाला. मार्टिन गपटिलने एक षटकार मारल्यानंतर त्याने दीपक चहरला खुन्नस दिली. त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर चहरने त्याला बाद केलं. हा सीन पहिल्यानंतर 1996 सालच्या विश्वचषकातील भारत पाकिस्तान सामन्याची आठवण येते. पाकिस्तानच्या अमिर सोहेलने दिलेल्या खुन्नशीला व्यंकटेश प्रसादने त्याला क्लीन बोल्ड करून उत्तर दिलं होतं.
दीपक चहर-मार्टिन गपटिल फाईट मोमेन्ट
हा किस्सा आहे बुधवारच्या सामन्यातील 18 व्या षटकातील. न्यूझीलंडचा मार्टिन गपटिलने दीपक चहरच्या पहिल्याच चेंडूवर एक षटकार मारला. त्यानंतर त्याने दीपक चहरला खुन्नस दिली. त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर दीपक चहरने मार्टिन गपटिलला आऊट केलं आणि त्याला उत्तर दिलं.
पाकिस्तानच्या अमिर सोहेलने प्रसादला डिवचलं
भारत-आणि पाकिस्तान या दोन संघादरम्यानचा सामना हा केवळ एक सामना राहत नाही तर तो एक संघर्ष, युद्ध असतं. 1996 सालच्या विश्वचषकातील बंगळुरु या ठिकाणी झालेल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचा संघ आमने-सामने होता. पाकिस्तानचा अमिर सोहेल फलंदाजी करत होता आणि भारताचा व्यंकटेश प्रसाद गोलंदाजी करत होता. प्रसादच्या एका चेंडूवर अमिरने पुढे येऊन ऑफ साईडला खणखणीत चौकार हाणला. त्यावेळी अमिरने प्रसादजवळ येऊन खुन्नस दिली आणि म्हणाला, पुढचा चेंडूला त्या तिकडे, सीमेपलीकडे मारणार.
पुढच्या चेंडूवर अमिर सोहेल क्लीन बोल्ड
अमिरच्या खुन्नसीवर प्रसादला राग तर आलेला पण त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. प्रसादने पुढचा चेंडू टाकला आणि अमिर सोहेल क्लीन बोल्ड झाला. त्यावेळी प्रसादने अमिरला तशीच खुन्नस दिली आणि अमिरला म्हणाला, "उस तरफ है ड्रेसिंग रूम, चलो निकलो."
भारत आणि न्यूझीलंड मध्ये सुरू असलेल्या टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पाच विकेट्सने पराभव केला.
महत्वाच्या बातम्या :
- Smriti Mandhana... बस नाम ही काफी है...! 150 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटनं धमाकेदार खेळी, रचला इतिहास
- T20I Rankings: टी 20 क्रमवारीत केएल राहुलची घसरण! गोलंदाजी, ऑलराऊंडरमध्ये TOP 10मधून टीम इंडिया आऊट
- Ind vs NZ 1st T20 Live Updates: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 5 विकेट्सनं विजय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha