(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 WC: भारत विरुद्ध पाक सामन्यापूर्वी इरफान पठाणने ट्विट करत उडवली पाकिस्तानची खिल्ली
Irfan Pathan: आज (रविवारी) टी -20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या शानदार सामन्यापूर्वी भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने ट्विट केले आहे.
Ind vs Pak Clash: टी -20 विश्वचषक 2021 (T20 World Cup) मध्ये, आज (रविवारी) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळला जाईल. या शानदार सामन्यापूर्वी भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी पाकिस्तानला टोला लगावला आहे.
पाकिस्तान हरला तर तिथले चाहते टीव्ही फोडतील, असे तो म्हणाला. भारतीय संघाकडून हारल्यानंतर अनेकदा पाकिस्तानी चाहत्यांचे टीव्ही फोडण्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. इरफान पठाणने यावर निशाणा साधला आहे. इरफानने रविवारी ट्विट केले की, 'जर ते (Pakistan) जिंकले तर हृदय तुटतील आणि आम्ही जिंकलो तर टीव्ही'.
इरफान पठाण म्हणाला की, जर पाकिस्तान जिंकला तर भारतीयांची मने तुटतील आणि भारत जिंकला तर पाकिस्तानमधील टीव्ही फुटतील. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 50 आणि 20 षटकांच्या फॉर्मेटमध्ये 12 सामने झाले आहेत. टीम इंडियाने हे सर्व सामने जिंकले. टी -20 विश्वचषकात दोन्ही संघ 5 वेळा आमनेसामने आले आहेत. भारतीय संघाने पाचही सामने जिंकले आहेत.
Wo jeete to dil tutenge,or hum jeete to TV ;)
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 24, 2021
यापूर्वी इरफान पठाणने या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11ची निवड केली होती. त्याने मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला आपल्या संघात समाविष्ट केले आहे. स्टार फिरकीपटू आर अश्विनला इरफानच्या संघात स्थान मिळालं नाही.
इरफान पठाणची प्लेईंग 11
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती.
भारताविरोधात पाकिस्तानचा संघ (अंतिम 12) : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हॅरिस रॉफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हैदर अली.
भारताचा संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, रविचंद्रन अश्विन, राहुल चहर, इशान किशन, शार्दूल ठाकूर