WI vs SA : सेमी फायनलमधील दोन संघ ठरले,दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये दाखल, रोमांचक लढतीत वेस्ट इंडिज पराभूत
T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मॅचमध्ये पावसानं व्यत्यय आणला होता. वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 135 धावा केल्या होत्या.
अँटिग्वा : टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024 ) सुपर 8 च्या लढतीत वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका (WI vs SA)आमने सामने आले होते. पावसामुळं सामन्याला उशिरानं सुरुवात झाली होती. वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 विकेटवर 135 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या आक्रमक फलंदाजीला रोखण्यात यश मिळवलं होतं. यानंतर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन ओव्हरनंतर पाऊस सुरु झाल्यानं डकवर्थ लुईस मेथड प्रमाणं धावसंख्या आणि ओव्हरमध्ये कपात करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 123 धावांचं आव्हान 17 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं. दक्षिण आफ्रिकेनं 5 बॉल बाकी ठेवत मॅच जिंकली. मार्क जान्सेननं 5 धावा हव्या असताना षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.
वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा फलंदाजी करताना केआर मेयर्स आणि आरएल चेस यांच्या दमदार फलंदाजीमुळं सन्मानजनक धावसंख्या उभारली. वेस्ट इंडिजच्या इतर फलंदाजांना आफ्रिकेच्या शम्सी पुढं दमदार फलंदाजी करता आली नाही. केआर मेयर्सनं 35, आर.चेसनं 52, आंद्रे रसेलनं 15 आणि एस. जोसेफनं 11 धावा केल्या. तर, आफ्रिकेकडून शम्सीनं 3 विकेट घेतल्या. तर इतर गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
पावसामुळं व्यत्यय, डकवर्थ लुईसमुळं बदल
दक्षिण आफ्रिकेनं डावाच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये दोन विकेट गमावल्या. दक्षिण आफ्रिकेला आंद्रे रसेलनं दोन धक्के दिले. यानंतर पावसामुळं मॅच थांबवण्यात आली. पाऊस थांबल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 123 धावांचं आव्हान 17 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं. क्विंटन डी कॉकनं 12 धावा केल्या. एडन मार्क्रमनं 18, ट्रिस्टन स्टब्सनं 29, हेनरिक क्लासेननं 22 , एम. जान्सेननं 21 धावा केल्या.
रोमांचक लढत
सुपर 8 च्या ग्रुप 2 मधून इंग्लंडनं सुपर 8 मध्ये प्रवेश केलेला आहे. वेस्ट इंडिजला पराभूत करत दक्षिण आफ्रिकेनं सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. रोमांचक लढतीत वेस्ट इंडिजला पराभूत करत दक्षिण आफ्रिकेनं विजयासह सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
वेस्ट इंडिज स्पर्धेबाहेर
वेस्ट इंडिज आणि अमेरिका हे दोन्ही आयोजक देश टी 20 वर्ल्ड कपच्या बाहेर गेले आहेत. वेस्ट इंडिजनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यासाठी कडवी लढत दिली. चेसनं दक्षिण आफ्रिकेच्या तीन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजवर अटीतटीच्या लढतीत दोन विकेट राखून विजय मिळवला आहे. ग्रुप 2 मधून सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनी प्रवेश केला आहे.
संबंधित बातम्या :