Team India: टीम इंडिया मायदेशी कधी दाखल होणार?; अखेर तारीख, ठिकाण अन् वेळ ठरली!
Team India: वादळामुळे बार्बाडोसचे विमानतळ बंद करण्यात आले असून तेथे कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Team India: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) अजूनही बार्बाडोसमध्ये अडकला आहे. टीम इंडियाने बार्बाडोसमध्ये अंतिम सामना खेळून टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले. शनिवारी, 29 जून रोजी अंतिम सामना खेळला गेला, त्यानंतर तेथे आलेल्या चक्रीवादळाने टीम इंडियाला बार्बाडोसमध्येच राहावे लागले. वादळामुळे बार्बाडोसचे विमानतळ बंद करण्यात आले असून तेथे कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. टीम इंडिया गेल्या मंगळवारी तिथून रवाना होणार होती, पण त्याला देखील उशीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे उद्या सकाळी 6 वाजता टीम इंडिया दिल्लीत पोहचणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
एक दिवसापूर्वी आलेल्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले होते की बीसीसीआयने टीम इंडियासाठी विशेष फ्लाइटची व्यवस्था केली आहे, ज्यामुळे त्यांना मंगळवारी परतण्यासाठी निघून बुधवारी संध्याकाळपर्यंत दिल्लीला पोहोचावे लागले. मात्र, आता त्यास आणखी विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. क्रीडा पत्रकार विमल कुमार यांनी एक्सच्या माध्यमातून सांगितले की, टीम इंडियाने आतापर्यंत दिल्लीला जाण्यासाठी चार्टर्ड फ्लाइटमध्ये बसायला हवे होते. परंतु त्याला आणखी विलंब होत आहे.
Indian team to arrive with the T20I World Cup by 6 am IST tomorrow at Delhi. [Abhishek Tripathi] pic.twitter.com/tESbW6YOQz
— Johns. (@CricCrazyJohns) July 3, 2024
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भारताचा विजय-
भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने 59 चेंडूत सर्वाधिक 76 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकात 8 विकेट गमावत 169 धावाच करू शकला. अशा प्रकारे भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला.
बीसीसीआयकडून टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस-
बीसीसीआयने भारतीय संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाला बीसीसीआय 125 कोटी रुपये देणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत ही घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह ट्विटरद्वारे म्हणाले की, मला कळवताना अतिशय आनंद होत आहे की, भारतीय संघाला आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी 125 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. भारतीय संघाने टी-20 विश्वचषकात उत्कृष्ट खेळ, प्रतिभा, जिद्द आणि खिलाडूवृत्ती दाखवली. टीम इंडिया दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन बनली.
संबंधित बातम्या:
हार्दिक पांड्याच्या मागची विघ्नं संपता संपेना; पुन्हा संशायाची पाल चुकचुकली, नेमंक काय घडलं?
रोहित-विराटपासून डेव्हिड वॉर्नरपर्यंत; 2024 च्या टी20 विश्वचषकानंतर कोणी-कोणी निवृत्ती घेतली?