एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 Ind vs SA Final: टीम इंडिया अन् दक्षिण अफ्रिकेच्या अंतिम सामन्याआधी महत्वाची होणार बैठक; आयसीसीने घेतला मोठा निर्णय

T20 World Cup 2024 Ind vs SA Final: विजेतेपदाच्या लढतीपूर्वी आयसीसीने बोर्डाच्या सर्व सदस्यांना केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर येण्याचे निमंत्रण दिले आहे.

T20 World Cup 2024 Ind vs SA Final: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024)स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण अफ्रिका (India vs South Africa) यांच्यात बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनूसार रात्री 8 वाजता या सामन्याला सुरु होईल. टीम इंडियाला जवळपास 11 वर्षांपासून कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयश आले आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथमच आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. या विजेतेपदाच्या लढतीपूर्वी आयसीसीने बोर्डाच्या सर्व सदस्यांना केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर येण्याचे निमंत्रण दिले आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तानसह अनेक देशांचे बोर्ड चेअरमन येथे उपस्थित राहणार आहेत.

एका मीडिया रिपोर्टनुसार, टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी आयसीसी बोर्ड सदस्यांची बैठक घेऊ शकते. याचा अर्थ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन रझा नक्वी आणि बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नीही एकमेकांना भेटू शकतात. अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. मोहसीन नक्वी हे पाकिस्तानच्या सध्याच्या सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्री देखील आहेत आणि ते सध्या एका बैठकीसाठी अमेरिकेत आहेत. अमेरिकेतील बैठक संपल्यानंतर मोहसीन थेट वेस्ट इंडिजला रवाना होण्याची शक्यता आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वर चर्चा होण्याची शक्यता-

आशिया चषक 2023 पासून पीसीबी आणि बीसीसीआयमध्ये वाद सुरू आहे. 2023 आशिया कपचे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानमध्ये उतरवण्यास नकार दिला होता. अशा परिस्थितीत भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपदही पाकिस्तानला देण्यात आले आहे आणि आयसीसीने नुकतेच पीसीबीच्या प्रस्तावित वेळापत्रकाला हिरवा झेंडा दाखवला आहे, ज्या अंतर्गत टीम इंडिया आपले सर्व सामने पाकिस्तानमध्ये खेळणार आहे. पण बीसीसीआय 2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी होणाऱ्या बोर्ड सदस्यांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करू शकते. ही स्पर्धा पाकिस्तानबाहेर हलवली जाऊ शकते, असे वृत्त आहे, परंतु पीसीबी कोणत्याही परिस्थितीत हे होऊ देऊ इच्छित नाही.

भारत पाकिस्तानमध्ये गेला नाही तर...

बीसीसीआयने अनेकवेळा आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही, असे बीसीसीआयचे मत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात न गेल्यास ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली जाईल. ज्या अंतर्गत भारताचे सामने संयुक्त अरब अमिराती किंवा इतर कोणत्याही ठिकाणी खेळवले जातील.

संबंधित बातम्या:

T20 World Cup 2024 Ind vs SA Final: रोहित शर्मा-विराट कोहलीला BCCI कडून पुन्हा संधी नाही?; आज अखेरचा टी-20 सामना ठरण्याची शक्यता

T20 World Cup 2024 Ind vs SA Final: राखीव दिवसापासून 'सुपर ओव्हर'पर्यंत; टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाऊस पडल्यास आयसीसीचे नियम काय?

T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक विजेता संघ होणार मालामाल; पराभूत झालेल्या संघांवरही पैशांचा पाऊस!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget