T20 World Cup 2024 Ind vs Pak: मारो मुझे मारो...पाकिस्तानच्या पराभवानंतर मोमिन भडकला; एकाचे शर्टही फाडले, Video
T20 World Cup 2024 Ind vs Pak: भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला.
T20 World Cup 2024 Ind vs Pak: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) काल भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या 120 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान एकवेळ विजयाच्या जवळ होता. पण भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला.
पाकिस्तानच्या या पराभवानंतर कर्णधार बाबर आझमसह इतर खेळाडूंवर टीका करण्यात येत आहे. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हारयरल होत आहे. ‘मारो मुझे मारो’ या वाक्यामुळे अधिक प्रसिद्ध असलेला मोमिन साकिब सुद्धा सामना पाहण्यााठी काल गेला होता. तिथून त्याने सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. विजयाच्या इतक्या जवळ असताना तुम्ही पराभूत कसे होऊ शकतात. विजयाची तयारी केली असताना कसे काय पराभूत होऊ शकतात?, हा सामना हातात होता...मग why, why, why? त्यानंतर मैदानात उपस्थित असणारा एक पाकिस्तानचा चाहता मोमिन साकिब समवण्यासाठी येतो. मात्र मोमिन साकिब त्यावरही चिडतो, रागवतो आणि त्याचं शर्ट फाडतो.
Why!? pic.twitter.com/mcftIqV9Df
— Momin Saqib (@mominsaqib) June 9, 2024
भारताकडून ऋषभ पंतच्या सर्वाधिक धावा-
भारताच्या डावाची सुरुवात विराट कोहली आणि रोहित शर्मानं केली होती. आज भारताचे अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली फेल ठरले. विराट कोहली 4 धावा करुन बाद झाला. यानंतर भारताला दुसरा धक्का रोहित शर्माच्या रुपात बसला. रोहित शर्मा 13 धावा करुन बाद झाला. रिषभ पंत आणि अक्षर पटेलच्या भागिदारीनं भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. अक्षर पटेलनं 20 केल्या. रिषभ पंतनं केलेल्या 42 धावांच्या जोरावर भारतानं 20 ओव्हरमध्ये 119 धावा केल्या. भारतानं अखेरच्या 30 रनमध्ये 7 विकेट गमावल्या. भारताच्या फलंदाजीमध्ये रोहित शर्मा, रिषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्याशिवाय इतर फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. भारतानं 20 ओव्हरमध्ये 119 धावांपर्यंत मजल मारली.
पाकिस्तानचा सातव्यांदा पराभव केला
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानवरचा हा सातवा विजय आहे. 2007 च्या विश्वचषकात उभय संघांमध्ये पहिला सामना झाला होता. 2024 पूर्वी, दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 7 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 6 वेळा भारतीय संघ विजयी झाला होता. मात्र या विजयानंतर टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विजय-पराजय विक्रम 7-1 असा झाला आहे.
विराट कोहली पहिल्यांदाच अपयशी ठरला
विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खूप धावा केल्या होत्या. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 डावांमध्ये कोहलीने आतापर्यंत चार अर्धशतके झळकावली आहेत. ज्या डावात त्याने एकही अर्धशतक झळकावले नाही त्यातही तो 36 धावांवर नाबाद राहिला. पण 2024 च्या टी-20 विश्वचषकात तो केवळ 4 धावा करून बाद झाला होता. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची ही त्याची सर्वात कमी धावसंख्या आहे.
संबंधित बातम्या:
बुमाराहने मॅच कुठे फिरवली, कुणाची विकेट टर्निंग पॉइंट ठरली, पाहा सर्व थरार