T20 World Cup 2021: टी 20 वर्ल्डकपमध्ये खेळणारे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू; विराट कोहली पहिल्या स्थानावर
Richest Cricketers T20 World Cup 2021: टी -20 विश्वचषकात खेळणाऱ्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय गेल आणि कमिन्सचाही या यादीत समावेश आहे.
Richest Cricketers at T20 World Cup 2021: या वर्षीचा टी -20 विश्वचषक (T20 World Cup 2021) यूएई (UAE) आणि ओमानमधील (Oman) पात्रता टप्प्यासह (Qualifier Stage) दणक्याने सुरू झाला आहे. 14 नोव्हेंबरपर्यंत खेळल्या जाणाऱ्या या महान क्रिकेट स्पर्धेत 23 ऑक्टोबर रोजी अबू धाबी (Abu Dhabi) येथे दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने Super 12 टप्प्याने सुरुवात होईल. टीम इंडिया (Team India) स्पर्धेचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) खेळणार आहे.
या वर्षी भारत (India), इंग्लंड (England), न्यूझीलंड (New zealand) आणि सध्याचे विजेते वेस्ट इंडिज (West Indies) हे जेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला या टी 20 विश्वचषकात सहभागी असलेल्या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीपासून (Virat Kohli) ते वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (Chris Gayle आणि ऑस्ट्रेलियाचा (Australia) स्टीव्ह स्मिथचे (Steve Smith) नावही या स्पेशल क्लबमध्ये समाविष्ट आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या जगातील या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊया.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)
या टी -20 विश्वचषकात विराट कोहली शेवटच्या वेळी कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे. विराटने अलीकडेच या स्पर्धेनंतर टी -20 मध्ये संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. श्रीमंत क्रिकेटपटूंच्या या यादीत कोहली पहिल्या स्थानावर आहे, ज्याची संपत्ती सुमारे 450 कोटी रुपये (60 मिलियन डॉलर) आहे. बीसीसीआयने (BCCI) विराटला ए+ ग्रेडमध्ये ठेवले आहे आणि त्याचा वार्षिक पगार 7 कोटी रुपये आहे. याशिवाय त्याला आयपीएलमध्ये आरसीबीकडून 17 कोटी रुपये मिळतात. रिपोर्टनुसार, विराटने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील प्रत्येक प्रमोशनल पोस्टसाठी 5 कोटी घेतो. याशिवाय, तो जगातील अनेक प्रसिद्ध ब्रॅण्डसाठी ब्रँड एंडोर्समेंट (Brand Endorsement) देखील करतो.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान खेळाडू पॅट कमिन्स (Pat Cummins)
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीतील दुसरे नाव अतिशय खास तसेच आश्चर्यचकित करणारे आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स असे नाव आहे. पॅट कमिन्सची निव्वळ संपत्ती 308 कोटी रुपये आहे. यावेळी त्याची गणना जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. हेच कारण आहे की केकेआरने त्याला गेल्या वर्षीच्या लिलावात तब्बल 15.5 कोटी रुपयांना खरेदी केले. कमिन्स ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये खेळतो.
वेस्ट इंडिजचा 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल (Chris Gayle)
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल मैदानावर त्याच्या विध्वंसक फलंदाजीसाठी तसेच मैदानाबाहेर त्याच्या विलासी आणि आलिशान जीवनशैलीसाठी ओळखला जातो. जर आपण 42 वर्षीय गेलच्या निव्वळ संपत्तीबद्दल बोललो तर ती सुमारे 262 कोटी रुपये आहे. रिपोर्ट्सनुसार गेलची वार्षिक कमाई सुमारे 36 कोटी रुपये आहे. IPL मध्ये त्याला पंजाब किंग्जकडून (PBKS) वार्षिक 2 कोटी रुपये पगार मिळतो. या व्यतिरिक्त, तो जाहिरातींद्वारेही मोठी कमाई करतो.
बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan)
बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू आणि संघाचा माजी कर्णधार शाकिब अल हसन त्याच्या चमकदार कामगिरीमुळे जगभरातील लीगचा भाग आहे. जर आपण त्याच्या निव्वळ संपत्तीबद्दल बोललो तर ते गेलच्या बरोबरीने सुमारे 262 कोटी रुपये आहे. आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणाऱ्या शाकिबला फ्रँचायझी वार्षिक 3.2 कोटी रुपये देते. याशिवाय, शाकिब आपली राष्ट्रीय टीम आणि जगभरातील लीग क्रिकेट खेळूनही भरपूर कमावतो. यासोबतच त्याच्याकडे अनेक ब्रॅण्डच्या जाहिरातींचा करार आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith)
ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ.. कोहली, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूटसह 'Fabulous Four' मध्ये समाविष्ट आहे. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 187 कोटी रुपये (25 मिलियन डॉलर) आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान स्मिथ चेंडू छेडछाड केल्याप्रकरणी दोषी आढळला होता, त्यामुळे त्याला निलंबितही करण्यात आले होते. याचा सर्वात मोठा परिणाम स्मिथच्या Brand Endorsement च्या कमाईवर झाला. तो IPL मध्ये दिल्ली कॅपिटल्स कडून खेळतो आणि त्याला वार्षिक 2.2 कोटी रुपये पगार मिळतो. याशिवाय त्याच्या नावावर अनेक स्थावर मालमत्ता आहेत. तो IPL मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो आणि त्याला वार्षिक 2.2 कोटी रुपये पगार मिळतो. याशिवाय त्याच्या नावावर अनेक स्थावर मालमत्ता आहेत.