एक्स्प्लोर

IRE Vs IND: टी-20 कर्णधारपदाच्या पदार्पणात हार्दिक पांड्याची खास विक्रमाला गवसणी

India tour of Ireland: आयर्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय टी-20 संघानं हार्दिक पांड्याच्या  (Hardik Pandya) नेतृत्वाखाली पहिल्या सामन्यात सात विकेट्सनं विजय मिळवत मालिकेत 1-0 नं आघाडी घेतलीय.

India tour of Ireland: आयर्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय टी-20 संघानं हार्दिक पांड्याच्या  (Hardik Pandya) नेतृत्वाखाली पहिल्या सामन्यात सात विकेट्सनं विजय मिळवला. पहिल्यांदाच भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्यासाठी आयर्लंडविरुद्ध पहिला टी-20 सामना खास ठरला.  टी-20 कर्णधारपदाच्या पदार्पणात हार्दिक पांड्यानं आयर्लंडचा सलामीवीर पॉल स्टर्लिंगला माघारी धाडून खास विक्रमाला गवसणी घातलीय. टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधारपद स्वीकारल्यानंतर विकेट घेणारा हार्दिक पांड्या भारताचा पहिला कर्णधार ठरलाय.

भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व करणारा हार्दिक पांड्या नववा कर्णधार
टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणारा हार्दिक पांड्या हा नववा खेळाडू आहे. त्याच्या आधी संघाची धुरा सांभाळणाऱ्या सर्व कर्णधारांना टी-20 क्रिकेटमध्ये एकही विकेट घेता आलेली नाही. आयर्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात हार्दिक पांड्यानं 2 षटके टाकली. ज्यात 26 धावा देऊन एक विकेट मिळवली.

भारताच्या टी-20 क्रिकेटमधील कर्णधारांची यादी-

क्रमांक कर्णधार विकेट्स
1 वीरेंद्र सेहवाग 0
2 महेंद्रसिंह धोनी 0
3 सुरेश रैना 0
4 अजिंक्य रहाणे 0
5 विराट कोहली 0
6 रोहित शर्मा 0
7 शिखर धवन 0
8 ऋषभ पंत 0
9 हार्दिक पांड्या 1

आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गुजरात टायटन्सची कमान सांभाळणाऱ्या हार्दिक पंड्यानं कर्णधारपदाच्या पदार्पणातच उत्कृष्ट कामगिरी केली. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सनं आयपीएल 2022 चं विजेतेपद पटकावलं. ज्यामुळं बीसीसीआयनं वरीष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पांड्याकडं भारतीय -20 संघाचं कर्णधारपद सोपावलं.

भारताचा आयर्लंडवर सात विकेट्सनं विजय
आयर्लंडविरुद्ध पहिल्या टी-20  सामन्यात हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पावसाच्या वारंवार व्यत्ययामुळं सामना दोन तास उशीरा सुरू करण्यात आला. दोन्ही डावांतील 8-8 षटके कमी करण्यात आली. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडच्या संघानं 12 षटकात चार विकेट्स गमावून भारतासमोर 109 धावांचं लक्ष्य ठेवलं. आयर्लंडकडून हॅरी टेक्टर तुफानी खेळी करत 33 चेंडूत 193 च्या सरासरीनं 64 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, आवेश खान आणि युजवेंद्र चहलला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं 9.2 षटकातच सामना जिंकला. भारताकडून दिपक हुडानं सर्वाधिक 29 चेंडूत 47 धावांची खेळी केली. 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंका संपलं असं वाटत होतं… पण सोनल-डिकवेलाने सगळा खेळच फिरवला! 90/5 वरून थेट 214... भारताची डोकेदुखी वाढवली
श्रीलंका संपलं असं वाटत होतं… पण सोनल-डिकवेलाने सगळा खेळच फिरवला! 90/5 वरून थेट 214... भारताची डोकेदुखी वाढवली
Aus vs Ban 1st Test : आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
Ind vs Sl 1st Test : कॉमन सेन्स वापर जरा...; मोहम्मद कैफ ऋषभ पंतवर उगाचच संतापला; नको नको ते बोलला
कॉमन सेन्स वापर जरा...; मोहम्मद कैफ ऋषभ पंतवर उगाचच संतापला; नको नको ते बोलला
Most NO-balls In Test Match : कसोटी क्रिकेटच्या इतिहासाला हादरवणारा विक्रम! जेव्हा एका सामन्यात टाकले तब्बल 103 नो-बॉल, नेमकं काय घडलं होतं?
कसोटी क्रिकेटच्या इतिहासाला हादरवणारा विक्रम! जेव्हा एका सामन्यात टाकले तब्बल 103 नो-बॉल, नेमकं काय घडलं होतं?

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
Embed widget