PAK vs SCO: पाकिस्तानचा स्कॉटलँडवर दणदणीत विजय
PAK vs SCO: या विश्वचषकात पाकिस्तानच्या संघानं सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी बजावून दाखवलीय.
![PAK vs SCO: पाकिस्तानचा स्कॉटलँडवर दणदणीत विजय T-20 World Cup 2021: Pakistan won by 77 runs against Scotland PAK vs SCO: पाकिस्तानचा स्कॉटलँडवर दणदणीत विजय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/07/68696d2a46784ee726e20cf3a5bffc94_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
T-20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकाच्या 41 सामन्यात पाकिस्तानच्या संघानं स्कॉटलँड (Pakistan Vs Scotland) 77 धावांनी पराभूत केलंय. शारजाह क्रिकेट मैदानात (Sharjah Cricket Stadium) हा सामना खेळण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून स्कॉटलँडसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलँडचा संघ डगमताना दिसला. पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर स्कॉटलँडच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. स्कॉटलँडच्या संघाला 20 षटकात विकेट्स गमावून धावा करता आल्या.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानकडून मुहम्मद रिझवान (19 बॉल 15 धावा), बाबर आझम (47 बॉल 66 धावा), फखर जमान (13 बॉल 8 धावा), मुहम्मद हाफीज (19 बॉल 31 धावा), शायेब मलिक (18 बॉल 53 धावा, नाबाद) आणि असीफ अलीने 4 बॉल खेळून 5 धावा केल्यात. ज्यामुळे पाकिस्तानच्या संघाने 20 षटकात 189 धावांचा डोंगर उभा केला. स्कॉटलँडकडून क्रिस ग्रीव्जनं दोन विकेट्स घेतल्या. तर, हम्झा ताहिर आणि सफयान शरीफ यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या स्कॉटलँडच्या संघाची सुरुवात खराब झाली. जॉर्ज मुन्से (31 बॉल 17), काइल कोएत्झर (16 बॉल 9), मॅथ्यू क्रॉस (8 बॉल 5 धावा), रिची बेरिंग्टन (37 बॉल 54 धावा), डायलन बज (2 बॉल 0 धाव), मायकेल लीस्क (14 बॉल 14 धावा), ख्रिस ग्रीव्ह्ज (12 बॉल 4 धावा), मार्क वॉटने 3 बॉलमध्ये 2 धावा केल्या. ज्यामुळे स्कॉटलँडला 20 षटकात 6 विकेट्स गमावून 117 धावा करता आल्या. पाकिस्तानकडून शदाब खाननं 2 विकेट्स घेतल्या. तर, शाहिन आफ्रिदी, हारिफ राऊफ आणि हसन अली यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)