(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rashid Khan 400 T20 Wickets: राशिद खानची ऐतिहासिक कामगिरी, टी-20 मध्ये गाठला 400 विकेट्सचा टप्पा
ICC T20 WC 2021 Update: टी-20 विश्वचषकाच्या 40 व्या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. आबुधाबीच्या शेख जायद स्डेडिअमवर हा सामना पार पडला.
ICC T20 WC 2021 Update: टी-20 विश्वचषकाच्या 40 व्या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाला न्यूझीलंडकडून (New Zealand Vs Afghanistan) पराभव स्वीकारावा लागला आहे. आबुधाबीच्या शेख जायद स्डेडिअमवर (Sheikh Zayed Stadium) हा सामना पार पडला. या पराभवानंतर अफगाणिस्तानचा संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलाय. दरम्यान, अफगाणिस्तानच्या संघाला पराभव स्वीकाराला लागला असला तरी त्यांचा लेग स्पिनर राशीद खाननं (Rashid Khan) नव्या विक्रमाला गवसणी घातलीय.
आबुधाबीच्या मैदानावर खेळण्यात आलेल्या सामन्यात राशिद खाननं त्याच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टीलला माघारी धाडत इतिहास रचलाय. या विकेट्सह राशीद खाननं टी-20 क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. रशीद टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचलाय. या यादीत वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो अव्वल स्थानी आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-
ब्राव्हो 553 विकेट्ससह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर वेस्ट इंडीजचा फिरकीपटू सुनील नारायण दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 425 विकेट्स घेतले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीर 420 विकेट्ससह तिसर्या क्रमांकावर आहे. या यादीत राशीद खानचा चौथ्या क्रमांकावर पोहचलाय. तर, बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन पाचव्या स्थानी आहेत. त्याच्या नावावर 398 विकेट्स आहेत.
अफगाणिस्तानचा 8 विकेट्सने पराभव
न्यूझीलंडविरुद्ध आज खेळण्यात आलेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 8 विकेट्सने पराभव झालाय. या पराभवानंतर अफगाणिस्तानचा संघ टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलाय. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. या सामन्यात अफगाणिस्तानने 20 षटकात 8 विकेट्स गमावून केवळ 124 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मिळालेले लक्ष्य न्यूझीलंडच्या संघाने 8 विकेट्स राखून पूर्ण केले.
हे देखील वाचा-