Suresh Raina VIDEO : पाकिस्तानविरोधात सामना जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे? सुरेश रैनाने सांगितला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यशाचा फॉर्म्युला
Champions Trophy Ind Vs Pak : वानखेडे स्टेडिअमवर अनेक अविस्मरणीय सामने खेळले गेले आहेत. आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयाचे सेलिब्रेशन वानखेडेवर झाले तर ते अभिमानास्पद असेल असं सुरेश रैना म्हणाला.
मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ हा मजबूत असून आपण विजय मिळवू शकतो असा विश्वास माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने व्यक्त केला. हार्दिक पांड्य आणि यशस्वी जयस्वालचा वापर कशा प्रकारे केला जातो तेदेखील निर्णायक असेल असंही रैना म्हणाला. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याचे सेलिब्रेशन जर वानखेडेवर झालं तर ते भारतीय क्रिकेटसाठी अभिमानास्पद असेल असं सुरेश रैना म्हणाला. सुरेश रैनाने एबीपी माझाशी खास संवाद साधला.
सुरेश रैना म्हणाला की, "चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताची टीम जाहीर झाली आहे. त्यामध्ये रोहित शर्मा कॅप्टन आहे, तर विराट कोहलीही संघाचा महत्त्वाचा भाग आहे. संघातील सर्वच खेळाडूंचा दर्जा उच्च आहे. प्रेशर हँडल करण्यासाठी मोहम्मद शमीसारखे अनुभवी गोलंदाज आहेत. हार्दिक पांड्याचा योग्य वापर कसा केला जातो आणि यशस्वी जयस्वालला कशा प्रकारे संघात आत्मविश्वास दिला जातो, हे निर्णायक ठरणार आहे."
पाकिस्तानविरोधात प्रेशर हँडल करणे महत्त्वाचं
भारत पाकिस्तान हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून प्रेशर हँडल करण्यावर भर दिला तर आपण विजय मिळवू शकतो असं सुरेश रैना म्हणाला. तो म्हणाला की, "आपली टीम खूप मजबूत आहे. सध्याच्या फॅसिलिटी उत्कृष्ट आहेत आणि उच्च दर्जाचे कोचेसही उपलब्ध आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, आणि कुलदीप यादव यांसारख्या उत्कृष्ट गोलंदाजांमुळे बॉलिंग विभाग खूपच मजबूत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयाचे सेलिब्रेशन वानखेडेवर
सुरेश रैना म्हणाला की, "ज्या प्रकारे टी-20 वर्ल्डकपच्या विजयाचं सेलिब्रेशन वानखेडे स्टेडियमवर करण्यात आलं, त्याच धर्तीवर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेलिब्रेशनचा उत्सव वानखेडे स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. वानखेडे स्टेडियमने क्रिकेटच्या दुनियेत 50 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे, आणि या ऐतिहासिक ठिकाणी अनेक संस्मरणीय सामने खेळले गेले आहेत. या गौरवशाली 50 वर्षांच्या प्रवासाबद्दल वानखेडे स्टेडियम आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनला शुभेच्छा. जर चॅम्पियन्स ट्रॉफीचे सेलिब्रेशन वानखेडेवर झाला, तर तो भारतीय क्रिकेटसाठी आणखी एक अभिमानाचा क्षण ठरेल."
असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल (उपकॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्सर पटेल, हार्दिक पांड्या, वाॅशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत आणि रविंद जडेजा .
ही बातमी वाचा: