Stupid, Stupid... म्हणणाऱ्या सुनील गावसकरांनी फक्त 6 महिन्यांत बदलला सूर, ऋषभ पंतबाबत आता काय बोलले? Video व्हायरल
England vs India 1st Test Day 2 : ऋषभला ऑस्ट्रेलियात झाप झाप झापलं, इंग्लंडमध्ये सहा महिन्यात कौतुकाचा वर्षाव, सुनील गावसकरांचा व्हिडिओ व्हायरल

Sunil Gavaskar on Rishabh Pant Stupid to Superb : 6 महिन्यांपूर्वी जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता, मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने खराब शॉट खेळला आणि स्कॉट बोलँडला त्याची विकेट दिली. त्यानंतर कमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असलेले दिग्गज सुनील गावसकर यांनी ऋषभ पंतवर जोरदार टीका केली होती.
पंतचा थराब शॉट पाहून त्याने रागाच्या भरात तीन वेळा स्टुपिड, स्टुपिड, स्टुपिड म्हटले, ज्याचा व्हिडिओही व्हायरल झाला. या घटनेनंतर सुमारे 6 महिन्यांनी, आता इंग्लंड दौऱ्यावर ऋषभ पंतने असे काही केले आहे, ज्यामुळे सुनील गावसकर त्यांचे चाहते बनले आहेत. इतकेच नाही तर गावसकर यांनी पंतचे कौतुक करताना तीन वेळा सुपर्ब, सुपर्ब, सुपर्ब...असेही म्हटले.
सुनील गावसकर ऋषभ पंतबद्दल काय म्हणाले?
खरं तर, इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडिया लीड्समधील हेडिंग्ली येथे पहिला कसोटी सामना खेळत आहे. पहिल्या दिवशी सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिलने शानदार शतके झळकावली, तर दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले.
Another 𝐒 word from Sunny G...𝐒𝐔𝐏𝐄𝐑𝐁!🫡#SonySportsNetwork #GroundTumharaJeetHamari #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia pic.twitter.com/w1SF4t7KRz
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) June 21, 2025
पंतने शानदार षटकार मारून त्याचे शतक पूर्ण केले आणि नंतर कोलांटी उडी मारुन सेलिब्रेशन केले. पंतची ही शैली पाहून समालोचन करणारे सुनील गावसकर खूप आनंदी झाले आणि त्यांनी पंतचे तीन वेळा सुपर्ब, सुपर्ब, सुपर्ब असे कौतुक केले. गावसकरचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारताचा पहिला डाव संपला...
पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणापर्यंत भारताने 7 विकेट गमावून 454 धावा केल्या होत्या. पण, दुसऱ्या सत्रात इंग्लिश गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले आणि टीम इंडियाचा पहिला डाव 471 धावांवर गुंडाळला. भारताकडून कर्णधार शुभमन गिलने 147, ऋषभ पंतने 134 आणि यशस्वी जैस्वालने 101 धावा केल्या. केएल राहुलने 42 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून जोश टंग आणि कर्णधार बेन स्टोक्सने 4-4 विकेट घेतल्या. ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हे ही वाचा -





















